अमोल धर्माधिकारी, पुणे
जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे निधन. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालेमहाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले . महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.
ना. धों. महानोर यांची रानकवी अशी ओळख होती. 1985 साली महाराष्ट्र सरकारकडून कृषीभूषण पुरस्कार मिळात तर 1991 साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला. निसर्गकवी महानोर यांच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. ना.धों. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी', ‘रानातल्या कविता' गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली.