मनोरंजन

जेव्हा नागराज मंजुळे म्हणतात, “जयंती झालीच पाहिजे!”

Published by : Lokshahi News

मराठी सिनेसृष्टीत ज्यांचं नाव आज अभिमानानं घेतलं जातं असे दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे नेहमीच कलेमार्फत वेगवेगळया सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. "फँड्री", "सैराट", "नाळ" तसेच "पावसाचा निबंध" या त्यांच्या अफलातून कलाकृतींना प्रेक्षकवर्गांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. उत्तम कथानकाचे जाणकार नागराज मंजुळे यांनी आज सकाळी सर्वत्र चर्चित असलेला मराठी चित्रपट "जयंती" चा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेयर करत जयंतीच्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत.

फेसबुकवर जयंतीचे "बॅज" लावून तयार केलेले स्वतःचे पोस्टर व्हायरल करणं, ताल धरायला लावणाऱ्या या सिनेमाच्या गाण्यांचे रिल्स बनवून ते व्हायरल करणारे तरुणवर्ग आणि प्रसारमाध्यमांमधल्या चर्चा अशा प्रकारे वेगवेगळया मार्गांनी आगामी मराठी चित्रपट "जयंती" गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्याचं उत्सुकता वाढवत आहे. दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित "जयंती" सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मागील आठवड्यात जयंती सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर जारी करण्यात आला आणि सहा दिवसात तब्बल १२ लाखाच्या वर लोकांनी ट्रेलर पहिला आहे तसेच पसंतीदेखील दिली आहे. सिनेमाच्या २ गाण्यांना देखील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. "जयंती" सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता "ऋतुराज वानखेडे" आणि अभिनेत्री "तितिक्षा तावडे" मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत, तर त्याचप्रमाणे सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news