nagraj manjule Admin
मनोरंजन

नागराज मंजुळे यांना समन्स, काय आहे प्रकरण?

नागराज मंजुळेंचा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या खाशाबा जाधव या चित्रपटाची कथा ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Published by : Team Lokshahi

सैराट चित्रपटाच्या यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेलं नाव म्हणजे नागराज मंजुळे होय. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडतात. त्यांच्या चित्रपटांची पटकथा ही नेहमीच वेगळी आणि हटके असते. नेहमीच गाजलेल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारे नागराज मंजुळेंचा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या खाशाबा जाधव या चित्रपटाची कथा ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

थोडक्यात

  • दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स

  • खाशाबा जाधव यांच्यावर आधारित चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात

  • खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉफीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवले आहे. खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉफी राईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे.

खाशाबा जाधव यांच्याविषयी बोलायचं झालं या चरित्र पुस्तकाचे हक्क संजय दुधाणे यांनी 2001 मध्ये खरेदी केलेत. त्यामुळे आता या कथेचे कॉपी राईटचे हक्क हे आता दुधाणे यांच्याकडे आहेत. चित्रपटासोबत निर्मिती आणि प्रदर्शन करण्यासाठी मनाई आणि ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अ‍ॅड. रविंद्र शिंदे व अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे यांना हजर रहाण्याचे समन्स पाठवले आहेत. दरम्यान. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्यांचे सगळेच चित्रपट हे गाजले आहेत. त्यांच्या चित्रपटांच्या यादीत 'फॅन्ड्री', ‘नाळ’, 'सैराट', 'झुंड', ‘नाळ 2’ हे चित्रपट आहेत. 

Manisha Kayande Tweet | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? मनिषा कायंदे यांचं ट्विट; नेमका अर्थ काय?

Latest Marathi News Updates live: ईव्हिम मशीनला विरोध करणारी याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

मंगळसूत्रात दोन वाट्या का असतात? महत्त्व जाणून घ्या

Gulkand Benefits : गुलाबाच्या पाकण्यांपासून तयार झालेला गुलकंद आरोग्यासाठी इतका फायदेशीर! कसा ते जाणून घ्या...

नरेश अरोरा यांचा Ajit Pawar यांच्या खांद्यावर हात, Amol Mitkari भडकले; थेट म्हणाले...