मनोरंजन

नागचैतन्य पुन्हा चढणार बोहल्यावर

Published by : Saurabh Gondhali

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा गेल्या वर्षीपासून तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्या दोघांचा २ ऑक्टोबर रोजी घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता.त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. लग्नाच्या ४ वर्षानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता नागा चैतन्यविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या घोषणेच्या अवघ्या ६ महिन्यांनंतर, नागा चैतन्य दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. नागा चैतन्यने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यावेळी नागा चैतन्य कोणत्याही अभिनेत्रीसोबत लग्न करू इच्छित नाही. त्यामुळे त्याची होणारी पत्नी ही चित्रपटसृष्टीच्या बाहेरील असणार आहे. समांथाशी घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य खूप खचला होता.रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य खूपच तुटला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करू नये, अशी त्याची इच्छा आहे. पण अजूनही अक्किनेनी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या गोष्टीवर वक्तव्य केलेलं नाही.

समंथा रुथ प्रभूसोबत लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यचं नाव अभिनेत्री श्रुती हासनसोबतच्या जोडले जात होते. तर ते दोघं लग्न करणार असल्यात्या चर्चा देखील सुरु होत्या. तर त्या दोघांचा ब्रेकअप झाला आणि काही काळानंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात समांथाची एण्ट्री झाली.दरम्यान, समांथाचे करिअर पाहता नागा चैतन्य आणि तिच्यात वाद सुरु असल्यामुळे ते विभक्त झाले असे म्हटले जाते. घटस्फोटाच्या घोषणेनंतर अभिनेत्री समंथाचा बोल्ड अवतार आणि बोल्ड चित्रपटांच्या पसंतीही चर्चेत होत्या. याशिवाय पुष्पा चित्रपटातील बोल्ड आयटन सॉन्गमुळे ती चर्चेत होते.

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु