"आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा" सांगत महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. लेखक आणि दिग्दर्शक अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांनी यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. सलील कुलकर्णी यांनी केलेली ही विशेष चर्चेत आहे.
सलील कुलकर्णी यांनी प्रवीण तरडे यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी हे फोटो शेअर करत सुंदर असे कॅप्शनही लिहिले आहे. त्यांनी प्रवीण तरडे यांच कौतुक केले आहे. तसेच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
सलील कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये लिहिले की...
प्रवीण विठ्ठल तरडे .. त्रिवार अभिनंदन ..
मराठी चित्रपटाचा परीघ मोठा केला आमच्या या मित्राने ...
एका वेळी सगळ्या थिएटर्स ला दोन भव्य चित्रपट एका दिग्दर्शकाचे असणं ही एक अद्भुत घटना आहे .
आमच्या मैत्रीचा प्रवास १९९८ - १९९९ पासूनचा ..
प्रवीणला कोणतीही गोष्ट करतांना पाहिली कि एक गोष्ट जाणवते .. हा माणूस त्या त्या वेळेला तिथे तिथे १०० नाही २००% असतो .
लिखाण , दिग्दर्शन , अभिनय , डबिंग , रेकॉर्डिंग , गप्पा , मैत्री .. सगळीकडे भरभरून जगणारा प्रवीण ..
ग्रेसच्या कवितेपासून .. क्रिकेट पर्यंत आणि चित्रपट तर त्याचा श्वास आहे ..
रंगमंचावर त्याची भक्ती आहे म्हणूनच .. कास्टिंग करतांना त्याचा पहिला प्रश्न असतो .. तुम्ही थिएटर केलंय का ?
आपल्या मित्रांना बरोबर घेऊन यशाची प्रत्येक पायरी चढणं हा गुण सुद्धा तितकाच मोठा ..
" धर्मवीर " पाहून त्याच्यामधल्या दिग्दर्शकाला सलाम केला .. आणि " सरसेनापती हंबीरराव " पाहून एक मित्र म्हणून .. एक मराठी कलाकार म्हणून मन अभिमानाने भरून आलं ..
आता मराठी चित्रपट सुद्धा साऊथ इंडियन फिल्म्स सारखा भव्य दिसतोय ..
इतर भाषेतले दिग्दर्शक सुद्धा आता " प्रवीण तरडे" सारखे चित्रपट करा असं म्हणतील ह्याची खात्री वाटते .
प्रवीण .. मित्रा .. खूप अभिमान आहे तुझ्या या प्रवासाबद्दल .. प्रत्येक टप्प्यावर कष्ट घेत इथपर्यंत आला आहेस हे तुझ्या सगळ्या मित्रांना ठाऊक आहे .. नवीन लोकांच्या पाठीशी उभा राहतोस तेव्हा तू त्यांच्यात तुझे struggle चे दिवस पाहतोस .. हे सुद्धा जाणवतं ...
प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Hambirrao Mohite) या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे यांनी साकारली आहे.