मनोरंजन

Musafira : मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार 'मुसाफिरा' टायटल सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत 'मुसाफिरा' या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली.

Published by : Siddhi Naringrekar

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत 'मुसाफिरा' या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटातील 'मुसाफिरा' हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. एका शानदार सोहळ्यात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या वेळी दिग्दर्शक पुष्कर जोग, निर्माते आनंद पंडित, नितीन वैद्य, वितरक नानूभाई जयसिंघानी, पुष्कराज चिरपुटकर, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी आदी उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील कलाकारांनी या गाण्यावर परफॉर्मन्सही सादर केला. हे गाणे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनी गायले आहे.

या एनर्जीने भरलेल्या टायटल सॉन्गला रोहन - रोहन यांचे संगीत लाभले असून हे गाणे मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे. मैत्रीचे नाते हे नेहमीच खास असते. एकत्र फिरणे, हसणे, खेळणे, रडणे अशा अनेक गोष्टी मैत्रीत केलेल्या असतात, अगदी भांडणेही. मैत्रीच्या या अशाच सुखद आठवणींना उजाळा देणारे आणि दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणणारे हे गाणे आहे. यात धमाल, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना आहेत. या अनुभवाबद्दल विशाल दादलानी म्हणतात, ‘’मला मराठी गाणी गायला खूप आवडतात. यापूर्वीही मी मराठी गाणी गायली आहेत. या शब्दांमध्ये खूप भावना दडलेल्या असतात. हे गाणे निश्चितच ऊर्जा देणारे असले तरीही याचा भावार्थ खूप खोलवर आहे. हे गाणे गाताना मी खूप एन्जॅाय केले आहे. जुन्या मैत्रीची आठवण करून देणारे हे जबरदस्त गाणे आहे.’’

गाण्याबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात , ' मुसाफिरा' हे गाणे नक्कीच सगळ्यांना आवडेल असे आहे. मैत्रीवर आधारित या गाण्याला बॉलिवूडचा दमदार आवाज लाभल्याने हे गाणे अधिकच श्रवणीय झाले आहे. अनेकांना हे गाणे नॉस्टेल्जिक बनवेल, अनेकांना मैत्रीची व्याख्या समजावेल. कॉलेजनंतर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो आणि या शर्यतीत आपण कुठेतरी स्वतःसाठी जगणे विसरून जातो. हे गाणे स्वत्त्व परत मिळवून देणारे आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री किती महत्वाची आहे, याची जाणीव करून देणारे हे गाणे आहे.'' मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.''

Latest Marathi News Updates live: राहुल गांधी यांनी अचानक नांदेडच्या बसस्थानकात दिली भेट,नागरिकांशी साधला संवाद

Matheran | कड्यावरच्या गणपती परिसरात बिबट्याचा वावर ; व्हायरल फोटोने खळबळ

Anil Parab on Jogeshwari Rada | कार्यकर्त्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले, अनिल परबांचा आरोप

Aawaj Lokshahicha | पंढरपुरात मविआत बिघाडीनंतर आवताडेंसमोर भालकेंचा निभाव लागणार का?

महायुतीमध्ये जाण्याबाबत अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट