सध्या चॅनेलचे टीआरपी वाढवण्याच्या शर्यतीत प्रत्येक चॅनेल मालिकांची मिसळ प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यात आता टीआरपीच्या शर्यतीत सध्या स्टार प्रवाहची झेप उंचावर जाताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवर नवनविन मालिंकांचे प्रोमो पडत आहेत. नवीन कलाकारांसह नव्या मालिकांची उत्सुकता स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांना लागलेली आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेतून निवेदिता शराफ या २ डिसेंबरपासून सोम-शनि दु. 2:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तर लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव हा सुद्धा स्टार प्रवाहवरील कलाकारांसह धिगांणा घालायला सज्ज झाला आहे. तो देखील ‘आता होऊ दे धिंगाणा 3’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 16 नोव्हेंबरपासून शनिवार-रविवार रा. 9:00 वाजता मनोरंजनाचा धक्का देण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अशातच स्टार प्रवाहवरच्या लाडक्या सुना म्हणजेच मृणाल दुसानिस आणि ज्ञानदा रामतीर्थकर या दोघी पुनरागमन करणार आहेत. मात्र यावेळी या दोघी ही एका वेगळ्या नात्यात म्हणजेच बहिणी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत विवेक सांगळे आणि विजय आंदळकर हे कलाकार देखील झळकणार आहेत. यांची मालिकेचे नाव‘लग्नानंतर होईलच प्रेम’असून भाग्याच्या ह्या अवखळ रेषा, कश्या जोडल्या गेल्या सांग.... असे कॅप्शन प्रोमोमध्ये देण्यात आलेलं आहे.
तर आता प्रेक्षकांना या नव्या मालिकेची उत्सुकता लागलेली असून यामध्ये नेमकी काय आवाहनं पाहायला मिळणार आहेत याकडे आता लक्ष लागलेलं आहे. तसेच ज्ञानदाने स्टार प्रवाहवरील टिपक्यांची रांगोळी या मालिकेतून अप्पू या पात्रासह प्रेक्षकांच्या मनात राज्य केल तर विजय आंदळकर हा पिंक्कीचा विजय असो या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं आला. मात्र आता या नव्या मालिकेला प्रेक्षकांकडून किती चांगला प्रतिसाद मिळणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.