मनोरंजन

“मी pansexual आहे, मला…”; अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

अभिनेत्री आणि म्यूजिशियन मोनिका डोगराने एका वृत्तवाहिनीशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. मोनिकाने काही दिवसांपूर्वीच Pansexual असल्याचा खुलासा केला होता. तिचे लग्न झाले आहे हे देखिल तिने लपवून ठेवले होते. मोनिका ही ३९ वर्षाची आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री आणि म्यूजिशियन मोनिका डोगराने एका वृत्तवाहिनीशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. मोनिकाने काही दिवसांपूर्वीच Pansexual असल्याचा खुलासा केला होता. तिचे लग्न झाले आहे हे देखिल तिने लपवून ठेवले होते. मोनिका ही ३९ वर्षाची आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, “मला मी Pansexual आहे हे कळण्याआधी, पाच-सहा वर्षापूर्वीच मी हा शब्द ऐकला होता आणि तेव्हा लगेच मला वाटलं की मी सुद्धा त्यापैकी एक असू शकते. एकतर तुम्ही समलैंगिक असता किंवा नसता. जर मी समलैंगिक आहे किंवा गे आहे असं सांगितलं असतं तर कुणीच माझा स्विकार केला नसता. ‘गे’ हा शब्द असा होता ज्याच्याविषयी समाजात फार काही चांगलं बोललं जात नाही.”

“मी अशा पुरुषाशी लग्न केलं होतं जो खुप समजूतदार, हुशार, प्रेमळ आणि चांगला माणूस आहे. मी जेव्हा त्याला सांगितलं की माझ्या चित्रपटात ट्रान्स वूमनची भूमिका साकारणारी महिला मला आवडते. त्यावेळी त्याने मला झिडकारलं नाही उलट अधिक प्रेम दिलं. आता आम्ही विभक्त झालो आहोत. आम्ही खूप विचार करुन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हेच एक कारण होतं की माझं लग्न मी नेहमी मीडियापासून लपवून ठेवलं.”

यासोबत तिने सांगितले की, “पण नंतर अचानक माझ्यात बदल होऊ लागले, मी नक्की कोण आहे याविषयी मनातला संभ्रम वाढत गेला. मग मला वाटलं कदाचित मी bisexual आहे, मला पुरुष आणि स्त्रीया दोन्ही आवडतात आणि तोपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की Pansexual म्हणजे नक्की काय आहे. मला ५ ते ६ वर्षांपूर्वी एवढं कळालं की मला feminine energy असलेले पुरुष आणि masculine energy असलेल्या स्त्रिया आवडतात. Pansexuality बद्दल अनेकांना माहित नाही. हे माझ्यासाठी सर्वात योग्य आहे असं मला वाटते, मला जे सुंदर दिसतं त्याचं मला आश्चर्य वाटतं.”

“शाळेत असताना मी अगदी टॉमबॉय सारखे वागायचे आणि जसजशी मी मोठी होत गेले तेव्हा मी स्त्रीत्वाचा देखील आनंद घेतला. मला दोन्ही लिंगांच्या व्यक्तींसमोर स्वतःला एक्सप्रेस करायला, त्यांना माझ्याकडे आकर्षित करून घ्यायला आवडायचं. मी कॉलेजमध्ये असेपर्यंत कधीही मुलीला किस केले नाही किंवा मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवले नाही.”

माहीम विधानसभेत भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा

Nilesh Rane Kudal Malvan Constituency : निलेश राणे पुन्हा गड काबीज करणार?

बीड: परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, राजेसाहेब देशमुख आणि राजेभाऊ फड यांचा उमेदवारी अर्ज वैध

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Dinesh Pardeshi Vaijapur Assembly Election; पहिल्यांदाच निवडणूक लढवणार