मनोरंजन

मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि...; मराठी अभिनेत्रीचा साजिद खानवर मोठा आरोप

साजिद खान सध्या बिग बॉस 16 मध्ये दिसत आहे. पण जेव्हापासून तो बिग बॉसमध्ये आहे, तेव्हापासून रोज त्याच्यावर नवनवीन आरोप होत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

साजिद खान सध्या बिग बॉस 16 मध्ये दिसत आहे. पण जेव्हापासून तो बिग बॉसमध्ये आहे, तेव्हापासून रोज त्याच्यावर नवनवीन आरोप होत आहेत. आता एका मराठी अभिनेत्रीने साजिद खानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री जयश्री गायकवाडने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जयश्री गायकवाड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपबीती सांगितली आहे

जयश्री गायकवाड म्हणाली की, मी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. 8 वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने मला पार्टीला नेले होते. तिथे माझी साजिद खानशी ओळख झाली. साजिद खानला भेटून मला खूप आनंद झाला. त्याने उद्या ऑफिसमध्ये यायला सांगितलं. मी एक चित्रपट करत आहे, त्यामध्ये तुम्हाला एखादी भूमिका मिळेल. मी ऑफिसमध्ये गेले असता साजिद एकटाच होता. तो मला इकडे-तिकडे स्पर्श करू लागला. घाणेरड्या कमेंट्स देऊ लागल्या.

मला सांगितले तू खूप सुंदर आहेस. पण मी तुला काम का देऊ? मी म्हणाले, सर तुम्हाला बदल्यात काय हवे आहे? मी चांगला अभिनय करते. यावर साजिद म्हणाला, अभिनय चालत नाही. मी जे म्हणेन. जे मी करेन. ते तुला करावे लागेल, असे त्याने म्हंटले. मला खूप राग आला. त्याचा खून करण्याची इच्छा झाली. आणि मी तेथून बाहेर पडलं, असे तिने व्हिडीओमध्ये म्हंटले आहे.

मी टूच्या मोहिमेदरम्यान अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. यानंतर साजिद खानचे करिअर वाईट अवस्थेत पोहोचले. बिग बॉसमध्ये एंट्री घेताना साजिदने मला गर्व झाला अभिमान असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच काही फ्लॉप चित्रपट त्यांनी केले. एकीकडे साजिदने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. दुसरीकडे शर्लिन चोप्रा, मंदाना करीमीसह अनेक अभिनेत्रींनी त्याला विरोध केला. या व्यक्तीने अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्याला बिग बॉसमध्ये येण्याचा अधिकार नाही, असे या अभिनेत्रींचे म्हणणे आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी