अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं काही दिवसांपूर्वीच ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पती राज कौशल यांच्या जाण्यामुळे मंदिरा बेदीला मोठा धक्का बसला आहे. अजूनही मंदिरा या दु:खातून सावरलेली नाही. या कठिण प्रसंगात आता मंदिरावर तिच्या कुटुंबाची देखील जबाबदारी आहे. कुटुंबाला सावरत अतानाच मंदिरा मात्र आजही आपल्या पतीच्या आठणींमध्ये गुंतली आहे. मंदिराने पती राज कौशल्या आठवणीत इन्स्टाग्रामवर मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली आहे.
मंदिरा बेदीने रात्री उशीरा पतीच्या आठवणीत एक फोटो शेअर केला आहे . या फोटत एका टिश्यू पेपरवर 'राजी'असं लिहिल्याचं दिसतंय. तर फोटोच्या कॅप्शनमध्ये मंदिराने "मिस यू राजी" असं लिहित पुढे तुटलेल्या हार्टचं इमोजी दिलं आहे. मध्यरात्री केलेल्या या पोस्टवरून पतीच्या निधनानंतर मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला असून तिला झोप लागणं देखील मुश्किल झाल्याचं लक्षात येतय.