Mandana Karimi Team Lokshahi
मनोरंजन

मंदाना करिमीने दिग्दर्शकावर केला गर्भपाताचा आरोप

Mandana Karimiनं 'लॉकअप'मध्ये आपला गर्भपात आणि सीक्रेट अफेअरशी संबंधित एक मोठा खळबळजनक दावा.

Published by : Team Lokshahi

मंदाना करिमी(Mandana Karimi) म्हणजे कंगनाच्या (Kangana Ranut) 'लॉकअप'(Lock UPP) मध्ये नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन धमाका करणारी कैदी. आतापर्यंत तिनं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत सगळ्याच गोष्टींवर उलट-सुलट बरीच वक्तव्य केली आहेत. मंदाना करिमीनं 'लॉकअप' मध्ये आपला गर्भपात आणि सीक्रेट अफेअरशी संबंधित एक मोठा खळबळजनक दावा केला होता. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली होती. तिनं मागे सांगितलं होतं की एका प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे ती गर्भवती राहिली होती. पण त्यानं तिला धोका दिला अन् त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता.

'लॉकअप' मध्ये मंदानाच्या या सीक्रेटमुळे कंगना रणौत देखील भावूक झाली होती. मंदाना म्हणाली होती की, जेव्हा तिचा घटस्फोट होत होता त्यावेळी तिचे एका प्रसिद्ध दिग्दर्शकाशी अफेअर सुरु होतं. तेव्हा मंदाना वाटलं होतं की हा दिग्दर्शक महिलांच्या अधिकासाठी बोलताना दिसतो, खूप लोकांसाठी एक आदर्श आहे,आणि हेच कारण होतं की ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिनं सांगितलं की त्यांनी दोघांनी आपल्याला बाळ हवं म्हणून प्रेग्नेंसी प्लॅन केली होती. पण जेव्हा मंदाना गर्भवती राहिली तेव्हा तो दिग्दर्शक (Director) म्हणाला की,'तो यासाठी तयार नाही',आणि त्यानं तिला सोडून दिलं. मंदानाचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर लोकांनी या प्रकरणाचा थेट संबंध लावला तो प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपशी.

एका नेटकऱ्यानं लिहिलं होतं, 'मला तो दिग्दर्शक कोण आहे हे माहित नाही पण मंदानासोबत जे झालं ते खूप भयानक घडलं'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं यावर म्हटलं की,'तो दिग्दर्शक अनुराग कश्यपच (Anurag Kashyap) असणार'. यावर आता अनुराग कश्यपचं नाव घेऊन मंदानानं मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाली आहे नेमकं मंदाना अनुराग कश्यपविषयी?

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण