मनोरंजन

ड्रग्जच्या नशेत बेफाम गाडी चालवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला अटक

अनेक अभिनेता - अभिनेत्री ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अश्वेथी बाबू ही वेगवेगळ्या कारणानं नेहमीच चर्चेत असते.

Published by : Siddhi Naringrekar

अनेक अभिनेता - अभिनेत्री ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अश्वेथी बाबू ही वेगवेगळ्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. आतासुद्धा अश्वेथी बाबू आणि तिचा मित्र नौफल यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही २०१८ मध्ये अश्वथी बाबूला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी तिच्या राहत्या घरात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले आहेत. ड्रग्ज पार्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या फ्लॅटवर छापा टाकला होता.

अश्वेथी बाबू आणि तिचा मित्र हे दोघेही अंमली पदार्थांच्या नशेत गाडी चालवताना आढळले. यावेळी त्यांनी रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्या दोघांवर वेगाने गाडी चालवणे आणि धोकादायकरित्या वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्वेथी आणि नौफल हे दोघेही केरळमधील कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरातून जात होते. त्यावेळी एका सिग्नलजवळ सिग्नल लागल्याने अनेकांनी गाड्या थांबवल्या होत्या. पण नौफल मात्र त्याची गाडी ही पुढे मागे करत होता. त्यानंतर त्याने भरधाव वेगाने गाडी चालवत अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी एका स्थानिक व्यक्तीने त्या गाडीचा पाठलाग केला. तसेच ती गाडी थांबवण्याचाही प्रयत्न केला.

मात्र नौफलने गाडी पुन्हा सुरु करत ती पळवण्याचा प्रयत्नात असताना त्या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे त्या दोघांना ती गाडी तिथेच सोडावी लागली. यानंतर ते दोघेही पळून जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result