Mahesh Babu Lokshahi Team
मनोरंजन

महेश बाबू बनले डिप्रेशनचा शिकार; जाणून घ्या कारण

महेश बाबू अगदी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते.

Published by : prashantpawar1

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू(mahesh babu) यांनी तेलगू चित्रपटांमध्ये (movies)आपलं अनोखेपन जपत सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये नामांकित आहेत. सध्या बॉलीवूडबद्दलच्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महेश बाबू हे बहुचर्चित आहेत. हिंदी चित्रपट(bollywood) निर्माते आणि अभिनेत्यांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. मात्र असं असून देखील कंगना राणावतसह अनेक सुपर स्टार्सनी देखील त्याला पाठिंबा दिलेला आहे. महेश बाबू हे तेलगू चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक समजले जाते. ते अवघ्या 4 वर्षांचे होते तेव्हाच त्यांनी अभिनयाच्या विश्वात पाऊल ठेवले होते.

महेश यांनी लहानपणी 12 चित्रपटं केली होती. यानंतर मात्र एकापेक्षा अधिक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तेलगू सिनेसृष्टीत महेश बाबूची जबरदस्त फॅन फॉलोइंग(fan following) आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक असतात. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की महेश बाबूच्या आयुष्यात एक असा देखील काळ आला होता की त्याक्षणी त्यांच्या वयक्तिक आयुष्यात सगळं काही विखुरलं गेलं होतं.

ज्या व्यक्तीच्या शिरपेचात लाईट...कॅमेरा...अ‍ॅक्शन या गोष्टी आहेत तोच व्यक्ती तीन वर्षांपासून चित्रपटांपासून दूर होता. सूत्रांच्या मते तो डिप्रेशनशी झुंज देत होता असं देखील सांगण्यात आलं. शेवटी असं झालं की महेशबाबूंना त्या वाईट टप्प्यातून पुढं जावं लागलं.

ही गोष्ट आहे 2007 या वर्षातली. त्याक्षणी महेश बाबू हे अगदी तीन वर्षे पडद्यावरून गायब झाल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. महेशबाबूंनी चित्रपटात पुनरागमन करावे अशी देखील चाहत्यांची विनंती होती. अखेर महेश बाबू ज्या कारणामुळे चित्रपटांपासून दुरावले होते त्या कारणाचा खुलासा नंतर त्यांनीच केला. खरंतर यावर्षी त्यांचा 'अतिधी' हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. महेशबाबूंना हे सहन झाले नाही. अगदी हेच कारण होते की महेश बाबू मानसिक दृष्ट्या सक्षम नव्हते.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...