संगीत प्रेमींसाठी अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहेत. प्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खान यांचे निधन झाले आहे. बऱ्याच महिन्यांपासून उस्ताद राशीद कर्करोगासोबत लढत होते. त्यांना कोलकाता मधील रूग्णालयात दाखल केले होते आणि ते ऑक्सिजन सपोर्टवर देखील होते. उस्ताद राशीद खान भारतातील शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातले मोठे नाव होते.
उस्ताद राशीद खान यांचे बॉलिवूडसाठी मोलाचे योगदान
२००४ मध्ये सुभाष घई यांच्या 'किसना' चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत द्यायला सुरूवात केली. या चित्रपटासाठी त्यांनी 'तोरे बिन मोहे चैन नहीं' आणि 'कहें उजाडी मोरी नींद' ही गाणीदेखील त्यांनी गायली होती. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी 'जब वी मेट' या चित्रपटातून उत्कृष्ट संगीतासाठी त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. 'आओगे जब तुम ओ साजना' आणि 'नैना फुल खिलेंगे' या गाण्यांमुळे देखील त्यांना विशेष ओळख मिळाली होती.
राशीद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. रशीद खान यांनी त्यांचे आजोबा उस्ताद नासिर हुसेन खान यांच्याकडून संगीताचे धडे घेतले होते. ते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते.