Lagan  Team Lokshahi
मनोरंजन

Lagan चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

'लगन' हा अगामी चित्रपट 6 मेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : shamal ghanekar

प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमभावना जपण्यात जास्त सुख असते, असा मध्यवर्ती विचार देणारा 'लगन' (Lagan) हा अगामी चित्रपट 6 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात पार पडला आहे. या चित्रपटाची निर्मिती ही जी. बी. एंटरटेंन्मेंटने आहे. आणि दिग्दर्शन हे अर्जून यशवंतराव गुजर (Arjun Yashwantrao Gujar) यांनी केले.

या चित्रपटामध्ये संघर्षावर मात करून प्रेम निभावणाऱ्या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सुंदर अशी सुंदर टॉगलाईन 'तुमचं ना..रडू लय जवळ असतं.. अन् तेच आमचा जीव घेतं'..! दिली आहे. प्रेम आणि नात्यामधील भावभावनांचा प्रवास दाखवला आहे. या चित्रपटामध्ये नवीन जोडी म्हणजे सुजित चौरे (Sujit Chaura) आणि श्वेता काळे (Shweta Kale) ही युवा जोडी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्याबरोबर स्मिता तांबे (Smita Tambe), प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ हे सर्व कलाकार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सोपान पुरंदरे (Sopan Purandare ) आणि रणजीत माने (Ranjit Mane) यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे. प्रेमाची वेगळी परिभाषा मांडणारा 'लगन' 6 मे ला प्रदर्शित होणार आहे. प्रेमाचा खरा अर्थ दाखवून देणारा आणि सोबत प्रेक्षकांची मने जिंकणारा 'लगन' चित्रपट प्रत्येकाला नक्कीच आवडेल, असा विश्वास सर्व कलाकारांनी व्यक्त केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news