मनोरंजन

Shah Rukh Khan : 'मन्नत'मध्ये पाल फिरते का? किंग खानने खास अंदाजात दिले चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' (Jawan) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने नवा विक्रम करत रिलीजच्या 15 दिवसांत भारतात या सिनेमाने 526 कोटींचां गल्ला जमवला आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' (Jawan) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने नवा विक्रम करत रिलीजच्या 15 दिवसांत भारतात या सिनेमाने 526 कोटींचां गल्ला जमवला आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आता शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.

शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. चाहते त्याचा लूक कॉपी करण्याचा प्रयक्न करत आहेत. आता त्याच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चाहता शाहरुख सारखा अॅक्शन करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत चाहत्याने लिहिलं आहे,"माझे मित्र यश, जलजला आणि प्रतीक यांनी 'जवान'चा हा सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा नक्कीच पाहा आणि प्रतिक्रिया द्या". व्हिडीओ शेअर करत किंग खानने लिहिलं आहे,"पुढच्यावेळी अॅक्शन सीन करताना माझी मदत करायला या".

मन्नत'मध्ये पाल फिरते का?

शाहरुख खानच्या 'आस्क एसआरके' या सेशनदरम्यान एका चाहत्याने प्रश्न विचारला की,"मन्नतमध्ये पाल फिरते का?". याप्रश्नाचं उत्तर देत किंग खानने लिहिलं आहे,"पाल फिरताना मी पाहिलेली नाही...पण फुलपाखरांना मात्र पाहिलं आहे. ती खूप सुंदर आहेत. त्यांना फुलांवर पाहायला मुलांना आवडते".

बाप बाप असतो

शाहरुखला टॅग करत एका यूजरने विचारलं की,"जवान' हा सिनेमा अबरामने पाहिला आहे का? सिनेमा पाहिल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"बाप बाप असतो...नाही..नाही..मी गंमत करत आहे. अबरामला 'जवान' सिनेमातील अॅक्शन सीन आणि क्लायमॅक्स आवडला.

शाहरुखचा आगामी 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाबद्दल प्रश्न विचारत एका चाहत्याने लिहिलं आहे की,"डंकी' या सिनेमात काय खास असणार आहे? यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"राजकुमार हिरानींचा सिनेमा आहे...आणखी काय हवं". शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...