मनोरंजन

Khushboo Tawde: खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांना झाली कन्याप्राप्ती, दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Published by : Team Lokshahi

खुशबू तावडे आणि संग्राम साळवी ही जोडी सध्या फार चर्चेत येताना दिसत आहे. दोघही त्यांच्या कामात व्यस्त आहेत, नुकतेच 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत संग्रामची धमाकेदार एंट्री झालेली पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत तो साकारत असलेली भूमिका देखील प्रेक्षकांच्या आवडीची होत आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम देखील मिळत आहे. तर खुशबू तावडे सुद्धा 'झी मराठी' वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत तिची उमाची भूमिका साकारताना दिसत होती.

मात्र खुशबू तावडेने या मालिकेतून निरोप घेतला होता. तर तिच्या जागी आता नवीव कलाकार ही भूमिका साकारताना दिसणार आहे. खुशबू तावडेने 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेला निरोप घेण्यामागचं कारण असं की, खुशबू तावडेने एक गोड बातमी दिली आहे. तिच्या घरी आता दुसऱ्यांदा पाळणा हलणार असून ती आणि संग्राम साळवी हे दोघे आता दुसऱ्यांदा आई वडिल झाले आहेत. खुशबूने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

ही गोड बातमी अभिनेत्री वैशाली भोसलेने सोशल मीडियाद्वारे जाहीर केली आहे जी 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत मंजुषा हे पात्र साकारत आहे. आता खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांचे अनेक मराठी तसेच हिंदी कलाकारांकडून अभिनंदन केले जात आहे.

Devendra Fadnavis on India Alliance Protest : इंडिया आघाडीच्या मुंबईतील आंदोलनावर फडणवीसांची टीका

Navratri 2024 | Thanyachi Durgeshwari | ठाण्याच्या दुर्गेश्वरीसाठी खास देखावा; पहिली झलक पाहाच

Navratri Vrat: नवरात्रीचे व्रत करताय का? जाणून घ्या नवरात्रीचे व्रत करण्यामागे मूळ हेतु काय आहे...

Navratri 2024 Mumbai Dadar Market : नवरात्रीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; दादरचं मार्केट खरेदीसाठी प्रसिद्ध

'जाणिजे यज्ञ कर्म' याचा अर्थ नेमका काय ते जाणून घ्या...