Khuda Haafiz Chapter II Team Lokshahi
मनोरंजन

Khuda Haafiz Chapter II: रिलीज डेट ठरली, विद्युत जामवालचा कडक परफॉर्मन्स

Published by : Akash Kukade

अभिनेता विद्युत जामवालची (Vidyut Jamwal) बॉलीवूडमध्ये आगळीवेगळी ओळख आहे. विद्युतला ऍक्शन सिनेमा करण्यात रस असल्याने त्याची बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक वेगळीच छाप आहे. तसा विद्युतची बॉलिवूडमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे.

सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अँक्शन हिरो म्हणून विद्युत जामवालचे नाव घेतले जाते. मागील दशकांत बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी या अभिनेत्यांनी मोठ्या प्रमाणावर अँक्शनपट करण्यास (Trailer Viral) सुरुवात केली होती. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत होता. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून जे नवे अभिनेते बॉलीवूडमध्ये आले आहेत, त्यामध्ये विद्युत जामवालच्या अभिनयानं अनेकांना चकित केले आहे. आशिय़ाई चित्रपट उद्योग विश्वामध्येच नव्हे, तर जगभरातील प्रभावशाली अँक्शन हिरोंच्या यादीत विद्युत जामवालचा पहिल्या दहा क्रमांकामध्ये समावेश होता.

विद्युतचा खुदा हाफिज चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे विद्युत सध्या चर्चेत आला आहे. विद्युतचा काही महिन्यांपूर्वी सनक नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. विद्युत खुदा हाफिजच्या दुसऱ्या भाग़ाच्या प्रदर्शनासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.

विद्युतचा खुदा हाफिज भाग दोन येत्या 17 जुनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते यांनी एका पोस्टमधून ही बातमी व्हायरल केली आहे. विद्युत जामवाल बरोबरच या चित्रपटामध्ये शिवलेखा ओबेरॉय दिसणार आहे. फारुख कबिर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का