मनोरंजन

KBC 2021 | ‘या’ शोद्वारे सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

केबीसी चा (KBC 13) येणाऱ्या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे . बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली (Sourav Ganguly)आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या प्रोमोमध्ये सेहवाग गाणी गाताना दिसून येत आहे. तसेच प्रश्नावली दरम्यान एकमेकांची मजा घेत सगळ्यांना खळखळून हसवत आहेत. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबद्दल अनेक गोष्टींची चर्चा यावेळी रंगणार आहे.

या दरम्यान, प्रोमोमध्ये होस्ट अमिताभ बच्चन सौरव आणि वीरेंद्रला प्रश्न विचारतात, की जर त्यांनी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? सेहवागने उत्तर दिले की 1988 मधील शहेनशहा चित्रपटात एक प्रसिद्ध संवाद आहे.

त्यावर बच्चन म्हणतात "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है", या वाक्यास प्रतिसाद देत. सेहवाग म्हणतो कि, "हम तो उनके बाप है ".यासोबतच ते वीरेंद्रला असे हि विचारता कि, मी असं ऐकलं आहे कि खेळ खेळत असताना तू गाणे गुणगुणत असतो. त्यावर तो उत्तर देतो कि, बॅट स्विंग करताना अनेक गोष्टी मनात येत असतात. त्यामुळे दुर्लक्ष करण्यासाठी मी गाणी गात असतो. अशा अनेक मनोरंजक गोष्टींचा खुलासा बिग बी शोमध्ये करणार आहेत.3 सप्टेंबर रोजी सोनी टीव्हीवर (sony tv) रात्री 9 वाजता मालिका प्रसारित होणार आहे.

कौन बनेगा करोडपती 13, ज्यामध्ये स्पर्धकांनी 7 कोटींचा ( 7 crore)जॅकपॉट जिंकण्यासाठी कठीण प्रश्नांच्या मालिकेचे उत्तर दिले , मात्र मालिकेतील तिसरा भाग हा शाहरुख खानने (Shah Rukh Khan) होस्ट केला होता. पण आता तिसरा भाग वगळता लोकप्रिय गेम शोचे होस्ट अमिताभ बच्चन करणार आहेत.

कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी स्टुडिओमध्ये प्रेक्षक येण्यास बंदी आणण्यात आली होती. परंतु या वेळी प्रेक्षक वर्ग खुला करण्यात आला आहे. सोनी लाइव्ह (SONY LIVE) आणि जिओ टीव्हीवर (JIOTV)ऑनलाइन देखील उपलब्ध आहे .

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का