Bhool Bhulaiyaa Team Lokshahi
मनोरंजन

कार्तिकचा 'भूलभूलैय्या 2' सापडला वादात : सोशल मीडियावरुन सिनेमाला विरोध

भूलभूलैय्या या सिनेमाच्या सीकव्लमध्ये लहान मुलांच्या लठ्ठपणावर खालच्या दर्जाचे हास्य-विनोद केल्याचे बोलले जात आहेत.

Published by : Team Lokshahi

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा अडवाणीचा (kiara Advani) 'भूलभूलैय्या 2' सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. अवघ्या सहा दिवसातचं या सिनेमाने 83 करोड कमावले असून हा चित्रपट लवकरच येत्या रविवारी 100 करोडच्या घरात पोहचेल असे बोलले जात आहे. २००७ साली बनवलेल्या 'भुलभुलैया' या सिनेमाच्या सीकव्लमध्ये लहान मुलाच्या लठ्ठपणावर खालच्या दर्जाचे हास्य-विनोद केल्याचे बोलले जात आहेत. अनीस बझ्मीच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या या सिनेमावर आता ट्रोलर्सने निशाणा साधला आहे.

सोशल मिडीयावर ऐका व्यकतीने 'भूलभूलैय्या २' (Bhool Bhulaiyaa) या संदर्भात पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा सिनेमा विनोदाच्या नावाखाली लहान मुलांच्या लठ्ठपणावर भाष्य करत आहे. फॅट शेमिंग या सिनेमाद्वारे केली जात आहे. सिनेमातील एका लहान मुलाच्या लठ्ठ शरिराबद्दल विनोद केला गेला आहे, म्हणूच या सिनेमात फॅट शेमिंग केली असल्याचा बोललं जात आहे.

तर सिनेमाची बाजू मांडत एका फॅनने प्रतिउत्तर म्हणून, 'हे प्रत्येकाच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. सिनेमातील ती गोष्ट फक्त विनोद म्हणून पाहिली तर तो विनोद आहे आणि उगाचच फॅट शेमिंगशी जोडली तर तो वाद आहे' असे भाष्य केले.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result