Kareena Kapoor Lokshahi Team
मनोरंजन

kareena kapoor khan : मुलं झाल्यानंतर करिनाने घेतला 'हा' निर्णय

वास्तविक जीवनात तिच्यासाठी अभिनेत्रीपेक्षा तिचे मातृत्व अधिक महत्त्वाचे आहे. खऱ्या आयुष्यात आई आणि पत्नीची भूमिका तिच्यासाठी महत्त्वाची आहे.

Published by : prashantpawar1

ही गोष्ट आहे जेव्हा करीना 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल चर्चित होती. तिने या चित्रपटादरम्यान सेटवर घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. तिने सांगितले की मुल झाल्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. कारण वास्तविक जीवनात तिच्यासाठी अभिनेत्रीपेक्षा तिचे मातृत्व अधिक महत्त्वाचे आहे. करीना म्हणते की तिने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या असल्या तरी देखील खऱ्या आयुष्यात आई आणि पत्नीची भूमिका तिच्यासाठी महत्त्वाची आहे. ही घटना 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटादरम्यान घडली जेव्हा करीना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लंडनमध्ये होती.

लंडनमध्ये असताना सैफ अली खान(Saif Ali Khan) देखील 'जवानी जानेमन' चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यावेळी त्यांचा धाकटा मुलगा जहांगीर त्यांच्यासोबत तिथे उपस्थित होता. करीना म्हणाली की या चित्रपटातील तिचे सहकलाकार इरफान खान, डोबरियाल आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया(Dimpal Kapadia) ज्यांना करीना आंटी म्हणते ही देखील तिथे उपस्थित होते. करीना या सर्व स्टार्सवर चांगलीच प्रभावित झाली आहे. त्यामुळे जेव्हा करीना चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायची तेव्हा ती आपला मुलगा जहांगीरला सोबत घेऊन जात असे जेणेकरून चित्रपटाचे शूटिंग होईल आणि वेळ मिळेल तेव्हा ती जहांगीरची काळजी घेत असे.

करीना म्हणाली की, अशा प्रकारे तिने चित्रपटाच्या सेटवर तीन भूमिका केल्या आई होण्याचे कर्तव्य, पत्नी होण्याचा धर्म आणि अभिनेत्री होण्याचे कर्म. अशाप्रकारे तिने चित्रपटादरम्यान वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही खेळले आणि खूप धमाल देखील केली. करिनाने सांगितले की, या चित्रपटादरम्यान तिला अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिच्यासाठी फायदेशीर ठरल्या.

करीना म्हणते की, ज्याक्षणी ती तिच्या मुलांपासून दुरावते त्यावेळी ती मनातल्या मनात स्वतः काळजीत असते. त्याबाबतीत करीना आणि सैफचा प्रयत्न असतो की ज्यावेळी ते शूटिंगसाठी मुंबईबाहेर जातात त्याक्षणी दोघांपैकी एक मुलं त्यांच्यासोबत राहतं. चार-पाच दिवसांच्या शूटिंगनंतर जेव्हाही ती घरी परतते तेव्हा ती तिच्या मुलांच्या डोळ्यात वाचते की तिच्या मुलांनी तिची किती आठवण काढली होती. एक स्त्री आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावते एक आई, पत्नी, आजी, बहीण, अभिनेत्री जरी असली तरी तिला आपल्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा