Karan Johar Team Lokshahi
मनोरंजन

Karan Johar : करण सापडला वादाच्या भोवऱ्यात...

नुकतच रांची सिव्हिल कोर्टाने चित्रपटावरील कॉपीराइट प्रकरणी आदेश दिला आहे.

Published by : prashantpawar1

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता करण जोहर (Karan Johar) यांचा आगामी चित्रपट 'जुग जुग जियो' रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रांची येथील लेखकाने करणवर चित्रपटाची कथा कॉपी केल्याचा आरोप केला होता. नुकतच रांची सिव्हिल कोर्टाने या चित्रपटावरील कॉपीराइट प्रकरणी आदेश दिला आहे. व्यावसायिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे प्रदर्शन न्यायालयात केले जाईल.

रांचीचे लेखक विशाल सिंह (Vishal Sinha) यांनी करण जोहरवर आरोप केला आहे की 'जुग जुग जियो' या चित्रपटाचा कंटेंट त्याच्या 'पानी रानी' या कथेसारखाच आहे. त्याला श्रेय न देता त्याची कथा चित्रपटात वापरण्यात आल्याचे विशालने सांगितले. त्याने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे तसेच दीड कोटी रुपयांची भरपाईही मागितली आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट न्यायालयात प्रदर्शित केला जाईल. 'जुग जुग जियो'ने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले आहे की नाही हे चित्रपट पाहिल्यानंतर न्यायमूर्ती एमसी झा ठरवतील. दोन्ही बाजूंचा युक्तिवादही न्यायालय विचारात घेणार आहे. याशिवाय पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकनेही करण जोहरवर त्याचे गाणे चोरल्याचा आरोप करणारी पोस्ट शेअर केली होती. अबरारने लिहिले की मी माझं 'नच पंजाबन' हे गाणं कोणत्याही भारतीय चित्रपटाला विकले नाही. मी नुकसान भरपाईसाठी न्यायालयात जाण्यासाठी हक्क राखून ठेवले आहेत. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी गाण्यांची कॉपी करू नये. हे माझे 6 वे गाणे आहे." ज्याची कॉपी केली जात आहे. ह्याला अजिबात परवानगी दिली जाणार नाही." अबरारचे 'नच पंजाबन' हे गाणे 2000 साली आले होते. हे गाणेही त्यावेळी खूप गाजले होते. अबरार हा व्यवसायाने गायक, गीतकार आणि राजकारणी देखील आहे. त्याला किंग ऑफ पाकिस्तानी पॉप ही पदवीही मिळालेली आहे. राज मेहता (Raj Mehata) दिग्दर्शित 'जुग जुग जिओ'मध्ये वरुण-कियारा व्यतिरिक्त अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल आणि टिस्का चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय