Karan Johar Team Lokshahi
मनोरंजन

Karan Johar : करण जोहरच्या बर्थडे पार्टीत कोरोनाचा धमाका ? ५५ पाहुणे कोविड पॉझिटिव्ह

स्टार्स बदनामीच्या भीतीने कोविड पॉझिटिव्ह असल्याचे उघड करत नाहीत

Published by : shweta walge

काहीदिवसांपूर्वी करण जोहरची (Karan Johar) ग्रँड बर्थडे पार्टी (Grand Birthday Party) साजरी झाली होती. या पार्टीत बॉलिवूडचे सर्व स्टार (Bollywood star) उपस्थित होते. तर आता या पार्टीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार करणच्या पार्टीत पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला असून 50 ते 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

करण जोहरने नुकताच त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा आणि करीना कपूर खान यांसारखे सर्व स्टार्स या पार्टीत सहभागी झाले होते. पण एका रिपोर्टनुसार, करण जोहरच्या या ग्रँड पार्टीत पाहुणे म्हणून आलेल्या 50 ते 55 लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे.

बॉलीवूड हंगामाच्या या अहवालानुसार, हे स्टार्स बदनामीच्या भीतीने कोविड पॉझिटिव्ह (Covid positive) असल्याचे उघड करत नाहीत. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील (Film industry) करण जोहरच्या अनेक जवळच्या मित्रांना पार्टीत कोविडची लागण झाली आहे. त्यापैकी बरेच जण ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे उघड करत नाहीत. बाकी स्टार्समध्ये हा संसर्ग कोणाच्या माध्यमातून पसरला हे सांगणे कठीण असले. तर कार्तिक आर्यनसोबत चित्रपटाचे प्रमोशन करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या माध्यमातून हा संसर्ग व्हायरल झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

कार्तिक आर्यननंतर (Karthik Aryan ) अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. काल संध्याकाळी आदित्य रॉय (Aditya Roy) कपूरनेही चाहत्यांना सांगितले की त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे