Kangana Ranaut Lokshahi Team
मनोरंजन

Kangana Ranaut; आयटम सॉंगमध्ये काम न करण्याचं कारण...

एक मुलाखतीत कंगणाने सांगितलं...

Published by : prashantpawar1

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत(kangana ranaut) ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना नेहमीच तिच्या विचारांबद्दल आणि आवडी-निवडीबद्दल मोकळेपणाने बोलत असते. कंगनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धाकड' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने फेअरनेस क्रीमच्या जाहिराती किंवा आयटम सॉन्ग करायला का आवडत नाही हे पुन्हा एकदा सांगितले आहे.

एका मुलाखतीत कंगनाने सांगितले की तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली तेव्हाही तिने कोणत्याही आयटम सॉंगमध्ये काम केले नाही किंवा फेअरनेस क्रीमची जाहिरात केली नाही. कंगनाने पुढे सांगितले की तिला स्वत:वर कोणत्याही प्रकारचा शिक्का मारायचा नाही आणि असे कोणतेही काम करण्याची इच्छा नाही ज्यासाठी तिला नंतर पश्चाताप करावा लागेल. आता ती तिच्या करिअरमध्ये अशा उंचीवर पोहोचली आहे जिथे ती इंडस्ट्रीत स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते.

कंगना म्हणाली की तिच्या चित्रपट कारकिर्दीकडे पाहिल्यास त्यात काही वादग्रस्त नाही. ती म्हणाली की मी जवळपास 20 वर्षे गप्प राहिली आहे आणि आता ती एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचली की कोणत्याही विषयावर आपले मत व्यक्त करू शकते. त्यामुळे कंगना राजकारण समाज आणि फिल्म इंडस्ट्रीबद्दल उघडपणे बोलत असते.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच 'धाकड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल(arjun rampaal) आणि दिव्या दत्ता(divya datta) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आता कंगनाचा ‘तेजस’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यात ती फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने तिच्या पुढच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावरही काम सुरू केले आहे ज्यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय