47 वर्षांपूर्वी देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा देशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यावर 'इमर्जन्सी' हा पीरियड ड्रामा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट इंदिरा गांधींच्या दोन मोठ्या निर्णयांवर आधारित असू शकतो, 25 जून 1975 ला लागू करण्यात आलेली आणीबाणी आणि 1 जून 1964 रोजी ऑपरेशन ब्लूस्टार. या चित्रपटात कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
कंगनाने या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती 'इमर्जन्सी'च्या संपूर्ण टीमसोबत दिसत आहे. त्यांनी या चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचन सत्र सुरू केले आहे. यादरम्यान अनेक लोक कंगनासह लॅपटॉप घेऊन बसले आहेत आणि स्क्रिप्ट्स वाचत आहेत.
कंगनाने दोन फोटो शेअर केले होते एका फोटोमध्ये ती तिच्या टीमसोबत स्क्रिप्टवर चर्चा करत आहे तर दुसऱ्यामध्ये अभिनेत्री स्क्रिप्ट वाचत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर वर्तमानपत्राची क्लिप शेअर केली होती. 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करताना त्यांनी हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. नुकताच कंगना राणौतचा 'धक्कड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आता कंगनाने एका नव्या पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे की ती लवकरच इमर्जन्सी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.