कंकना रनौत सध्या राजकीयवर्तूळात पाहायला मिळत आहे. कंकना रनौत नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येताना दिसली आहे. तिच्या संबंधीत अनेक वादग्रस्त प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा कंगना रनौत एका नव्या कारणासह चर्चेत येताना दिसत आहे. यावेळी ती कोणत्याही प्रकारच्या राजकीय घडामोडींमुळे नाही तर तिच्या नवीन येणाऱ्या चित्रणामुळे चर्चेत येताना दिसत आहे. कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अडथळे निर्माण होत आहे.
कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेली आहे. कंगनाचा इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता. ज्याची रिलीज डेट आता पुढील 10 दिवसांत जाहीर होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाबाबत वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत एक अपडेट समोर आली आहे. खासदार कंगना रनौत या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आणि दिग्दर्शिका देखील आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे.