President & Kangana Team Lokshahi
मनोरंजन

कंगणाने घेतली राष्ट्रपतींची भेट; काय घडलं नक्की भेटीदरम्यान....

कंगना राणौतने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत राष्ट्रपतींचे मानले आभार

Published by : prashantpawar1

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने शुक्रवारी भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Precident Dropadi Murmu) यांची भेट घेतली. यादरम्यान अभिनेत्रीने राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत करत त्यांच्यासोबत एक फोटो देखील काढला. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत राष्ट्रपतींचे आभारही मानले आहेत. आणि त्यांच्यासोबतच्या भेटी दरम्यानचा अनुभव देखील शेअर केला. कंगनाने लिहिले की 'माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना भेटून खूप आनंद झाला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आवाज व शांत स्वभाव आणि दयाळूपणाचं कौतुक करत तिने लिहिले की 'राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसलेली द्रौपदी मुर्मू शक्ती आणि मार्गदर्शनाचे प्रतीक असलेल्या देवीसारखी दिसते. अभिनेत्री पुढे म्हणाली 'राष्ट्रपतींनी सांगितले की जेव्हा ती या देशातील सर्वोच्च नागरिकाच्या पदावर पोहोचली तेव्हा प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटला. याबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत की मला आजही त्यांना भेटल्याचा आनंद वाटतो जय हिंद.

कंगना राणौतची पोस्ट

यावेळी कंगना रणौत राजकीय मुद्द्यांवर देखील बोलली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, मी नेहमीच म्हणते की मी नेताजी सुभाष चंद्रवादी आहे. गांधीवादी नाही. माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे माझे चाहते अनेकदा नाराज होतात. प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग आहे आणि माझा विश्वास आहे की नेताजी आणि वीर सावरकरांसारख्या इतर अनेक क्रांतिकारकांचा संघर्ष पूर्णपणे नाकारला गेला आहे. चेहऱ्याच्या एका बाजूला थप्पड मारली की दुसरीही मी फॉरवर्ड करेन, अशी एकच बाजू दाखवण्यात आली. उपोषण आणि दांडी पदयात्रा करून स्वातंत्र्य मिळवले ही बाजू आम्हाला दाखवण्यात आली, असं ती म्हणाली.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news