नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली 40 वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता 'काळी राणी' या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटयकारकिर्दीचं शतक साजरं करतायेत. 'काळी राणी' हे त्यांच 100 व नाटकं 11 डिसेंबरला रंगभूमीवर येतयं.
या नाटकाची खासियत म्हणजे विजय केंकरे यांचे जसे 100 वे नाटक आहे तसेच या नाटकाशी संबधित असलेल्या कलाकार तंत्रज्ञ यांनीही या नाटकाद्वारे आपल्या नाटयकारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत. हे नाटक आहे. एका राणीचं स्वप्न आहे. मायानगरीमधल्या रंगीबेरंगी दुनियेवर राज्य करण्याचं, एका अशा लेखकाचं ज्याचा प्रत्येक चित्रपट सिल्व्हर जुबली आहे.
ज्याच्या साठी फक्त स्वतःच नावच सर्वस्व आहे.आणि एका निर्मात्याच ज्यानी ह्या दोघाना चित्रपट सृष्टी ची सफर घडवलेली आहे, हा निर्माता म्हणजे चित्रपटसृष्टी नी पाहिलेला सर्वात मोठा शो मॅन. एकमेकांच्या स्वप्नांत अडकलेल्या तीन व्यक्ती तुमच्या भेटीला येणार आहेत. ‘काळी राणी’ ह्या दोन अंकी नाटकामधून.
मल्हार आणि दिशा निर्मित 'काळी राणी' या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांचे असून दिग्दर्शन- विजय केंकरे यांचे आहे. नेपथ्याची प्रदीप मुळ्ये तर प्रकाशयोजनेची जबाबदारी शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. संगीत अजित परब यांचे असून वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. रंगभूषा राजेश परब यांची असून वेशभूषा संध्या खरात यांची आहे सूत्रधार संतोष शिदम आहेत. या नाटकाचे निर्माते प्रिया पाटील, डॉ. माधुरी सरनाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम आहेत.
विजय केंकरे यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसारख्या माध्यमांमध्येही काम केले असले तरी नाटक हाच त्यांचा पिंड. रंगभूमीवर अव्याहत न थकता काम करणारी जे रंगकर्मी आहेत. आपल्या वडिलांचा दामू केंकरे यांचा रंगभूमीचा खणखणीत वारसा घेऊन विजय केंकरे यांची वाटचाल सुरु आहे. व्यवसायिक आणि समांतर रंगभूमीवरील सुमारे शंभर नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या विजय केंकरे यांनी आजवर वेगवेगळया भिन्न जातकुळीची नाटकं दिग्दर्शित करून टाइपकास्ट न होण्याची दक्षता घेतली. यातूनच त्यांच्या यशस्वी दिग्दर्शकीय कारकीर्दीची कल्पना येईल.