5 जी तंत्रज्ञान लवकरच भारतात लागू होणार आहे. त्याचा पर्यावरणावर तसेच लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार असल्याचे सांगत, अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून न्यायालयाने जुही चावला यांना चांगलच फटकारलं असून २० लाखांचा दंड ठोठावला आहे.
जूही चावला यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये अशी मागणी केली गेली होती की, 5 जी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचा विचार करण्यापूर्वी त्यासंबंधित सर्व प्रकारच्या अभ्यासांवर बारकाईने विचार केला पाहिजे. त्यानंतरच भारतात या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करता येऊ शकते. दिल्ली उच्च न्यायालयाने जुही यांची याचिका फेटाळून लावली असून ही याचिका प्रसिद्धीसाठी दाखल केला आहे असा आरोप न्यायालयाने केला आहे.