कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून देशभरात चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. मात्र बॉलीवूड(Bollywood) चित्रपटांच्या कमाईचे मार्ग अजूनही बंदच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पण जेव्हा एखादा हिंदी चित्रपट(Bollywood Movie) बॉक्स ऑफिसवर रिलीज होतो तेव्हा त्याकडे प्रेक्षकांचे फारसे लक्ष नसल्याचं दिसून येतं. आता असाच काहीसा प्रकार या आठवड्यात रिलीज झालेल्या रणवीर सिंग(Ranveer Singh) याचा 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाबाबत झाला आहे. पहिल्या दिवशी अत्यंत खराब सुरुवात झालेल्या या चित्रपटाला दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांची उत्कंठा वाढवावी लागली आहे.
चित्रपट विश्लेषकांनी 'जयेशभाई जोरदार'च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत जे निर्मात्यांसाठी अगदी निराशाजनक आहेत. शनिवारी दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर केवळ 4 कोटींचा व्यवसाय केला आहे. याआधी शुक्रवारी या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. म्हणजेच दोन दिवसांत या चित्रपटाने 7.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. कमाईच्या या संथ गतीमुळे चित्रपट पहिल्या वीकेंडला केवळ 12 कोटींचा गल्ला गाठू शकेल असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.