John Abraham Team Lokshahi
मनोरंजन

जॉनचा दमदार लुक व्हायरल : 'तेहरान'च्या शुटिंगला सुरुवात...

जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे बऱ्याच प्रमाणात चर्चेत आहे

Published by : prashantpawar1

जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे बऱ्याच प्रमाणात चर्चेत आहे. नुकतच त्याच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये त्याची स्टाइल आणि त्याचा दमदार लूक सर्वांनाच आवडला होता. याव्यतिरिक्त त्याने त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी 'तेहरान' या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केलेलं आहे. जॉनने आतापासून दिनेश विजानच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. यासोबतच त्याने या चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. जॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आगामी चित्रपट 'तेहरान'चा टीझर पोस्टर रिलीज केला आहे.

या पोस्टरमध्ये त्याचा दमदार आणि जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर करण्यासोबत जॉनने लिहिले आहे की 'प्रजासत्ताक दिन 2023 साठी तयार व्हा. माझा पुढचा चित्रपट 'तेहरान' हा अरुण गोपालन दिग्दर्शित करणार आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट अॅक्शन थ्रिलरसह एका सत्य घटनेवर आधारित असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करणार आहेत. 'बदलापूर', 'स्त्री' आणि 'मिमी' सारखे हिट चित्रपट देणारे दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री कोण असणार याचा सस्पेन्स अजून उलगडलेला नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॉन अब्राहम 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'अटॅक' चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर 'पठाण', 'एक व्हिलन रिटर्न' आणि 'तेहरान' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. जॉन चित्रपटाच्या पडद्यावर बहुतेक अॅक्शन चित्रपटांमध्ये दिसतो. आता 'तेहरान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात कितपत यशस्वी होतो हे पाहावे लागेल.

IPL Mega Auction 2025 Live: केएल राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत