Admin
मनोरंजन

आम्ही मुंबईचे आहोत, आमच्या शहरातील हल्लेखोर तुमच्या देशात उजळ माथ्यानं फिरत आहेत; जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावलं

Published by : Siddhi Naringrekar

जावेद अख्तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते अनेक प्रकरणावर आपले मत देत असतात. नुकतेच जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानात गेले होते आणि त्यादरम्यान त्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जावेद यांनी आता थेट पाकिस्तानत जाऊनच त्यांना खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानातील लाहोर इथं झालेल्या 'फैज फेस्टिव्हल २०२३मध्ये जावेद अख्तर सहभागी झाले होते. त्यावेळी जावेद अख्तर म्हणाले की, आपण एकमेकांवर आरोप करायला नको. कारण त्यातून काहीच साध्य होणार नाही. आम्ही मुंबईचे लोकं आहोत. तुम्ही सर्वांना पाहिलं की आमच्या शहरावर कसा हल्ला झाला. हल्लेखोर ना नॉर्वेमधून आले होते ना इजिप्तमधून. आजही ते लोक तुमच्या देशात उजळ माथ्यानं फिरत आहेतत. जर अशी तक्रार एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. असे जावेद अख्तर म्हणाले.

यासोबतच त्यांनी म्हटले की, आमच्या भारतामध्ये नुसरत फते अली यांचे मोठे कार्यक्रम झाले. मेहंदी हसन यांच्या मैफिली झाल्या. परंतु तुमच्या देशात मात्र लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम झाला नाही. असे जावेद अख्तर म्हणाले यावर तिथल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना समर्थन दिले.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम