Allu Arjun Team Lokshahi
मनोरंजन

Pushpa 2 : 'पुष्पा द रुल'साठी अल्लू अर्जुन घेतोय एवढं मानधन?

अल्लू अर्जुनने पुष्पा पार्ट 2 साठी त्याच्या मानधनात वाढ केली आहे.

Published by : prashantpawar1

साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांच्या ​​पुष्पा या चित्रपटाची सध्या खूप क्रेझ वाढली आहे. पुष्पा पार्ट1च्या प्रचंड घवघवीत यशानंतर निर्माते 'पुष्पा द रुल' या दुसऱ्या भागाच्या तयारीला जोमाने लागले आहेत. दरम्यान अशा काही बातम्या येत आहेत की अल्लू अर्जुनने पुष्पा पार्ट 2 साठी त्याच्या मानधनात वाढ केली आहे. पुष्पा आता पहिल्या भागाच्या दुप्पट किमतीत पुष्पा 2 चित्रपटात काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे 'पुष्पा द राइज' हा अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. पुष्पाच्या पहिल्या भागाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचे भरपूर प्रमाणात मनोरंजन केले आहे. यासोबतच अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयाचेही यावेळी सर्वांनी कौतुक केलेलं आहे. अशा स्थितीत अल्लु अर्जुन यांना 'पुष्पा द रुल' साठी फी वाढवणं गरजेचं होतं आणि असच काहीसं घडलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पुष्पा 1 च्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या भाग 2 साठी 85 कोटी रुपये शुल्क आकारले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लूने पुष्पाच्या पहिल्या भागासाठी 30 ते 40 कोटी रुपये एवढं मानधन स्वीकारलं होतं. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन पुष्पा 2 साठी दुप्पट फी आकारत आहे. पुष्पा 1 च्या घवघवीत यशानंतर निर्माते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये 'पुष्पा द रुल' म्हणजेच भाग 2 चे शूटिंग सुरू करू शकतात.

पुष्पा पार्ट 2 मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) पुन्हा एकदा साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत धमाल करताना दिसणार आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडल्याची माहिती आहे. यासोबतच या चित्रपटाची क्रेझही तेवढ्याच प्रमाणात पाहायला मिळाली.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत