मनोरंजन

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू, अजय देवगण-चिरंजीवीला मिळाला हा मान

53 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात सुरू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

53 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात सुरू झाला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. भारताच्या या मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हिंदी सिनेजगतासह साऊथ इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि दक्षिणेतील दिग्गज अभिनेते चिरंजीवी यांना इफ्फीमध्ये विशेष सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी यांना ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. हे देखील स्वाभाविक आहे कारण चिरंजीवीने दीडशेहून अधिक चित्रपट करून स्वतःसाठी एक खास व्यासपीठ निर्माण केले आहे. दुसरीकडे, यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब पटकावणारा बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण याला विशेष सन्मानाने गौरविण्यात आले आहे. अजय व्यतिरिक्त, हिंदी चित्रपट अभिनेते परेश रावल, सुनील शेट्टी, मनोज बायपेयी आणि बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील आणि लेखक विजयेंद्र प्रसाद यांना IFFI 2022 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा हा मोठा चित्रपट महोत्सव रविवार 20 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. गोव्यातील डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथील इनडोअर स्टेडियममध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार असून, त्यात देश-विदेशातील अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक चित्रपटांची निवड झाली आहे. ज्यावर आधारित 53 व्या IFFI दरम्यान 25 फीचर आणि 20 नॉन फीचर चित्रपट भारतीय पॅनोरमा अंतर्गत प्रदर्शित केले जातील. याशिवाय 183 चित्रपट आंतरराष्ट्रीय प्रोग्रामिंग अंतर्गत ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर यावेळी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 79 देशांतील 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय