पंडित भीमसेन जोशी यांची 24 जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्यांचे संपूर्ण नाव पंडित भीमसेन गुरुराज जोशी आहे. आपल्या उत्कृष्ट गायनामुळे ते केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रसिध्द होते. त्यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त पंडित भीमसेन जोशी यांच्याबद्दल जाणून घेऊया न माहित असलेल्या गोष्टी.
पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी कर्नाटकमधील गदत या गावामध्ये झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 16 भावंडं होते. लहान असताना पं. भीमसेन जोशी यांच्या आईचे निधन झाले होते, ज्यामुळे त्यांच्या सावत्र आईने त्यांचे संगोपन केले होते.
कुर्तकोटी चन्नाप्पा पं. भीमसेन जोशी यांचे पहिले संगीत शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध गायक इनायत खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले. पं. भीमसेन जोशी यांना संगीतकार बनण्याची प्रेरणा अब्दुल करीम खान यांच्या 'पिया बिन नहीं आवत है चैन' या गाण्याने त्यांना संगीतकार बणण्याची प्रेरणा मिळाली होती. संगीताच्या आवडीमुळेच पंडित भीमसेन जोशी यांनी वयाच्या 11व्या वर्षी आपले घर सोडून गुरूच्या शोधात उत्तर भारतात गेले.
1936 मध्ये सवाई गंधर्व पं. भीमसेन जोशी यांचे गुरू झाले होते. वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजेच 1941 साली त्यांनी पहिल्यांदा लाईव्ह शो केले होते. एक वर्षानंतर पं. भीमसेन जोशी यांचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला होता. एकेकाळी, पं. भीमसेन जोशी यांना सर्दी झाली होती. त्यावेळी त्यांना एका कार्यक्रमात गायन करायचे होते. परंतु, शो रद्द होऊ नये यासाठी त्यांनी तब्बल 16 हिरव्या मिरच्या खाल्ल्या होत्या.
पं. भीमसेन जोशी यांना त्यांच्या कारर्कीदीसाठी भारत सरकारने पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न यासोबत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. 24 जानेवारी 2011 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले होते.