मनोरंजन

हृता दुर्गुळेचा 'कन्नी' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले

Published by : Siddhi Naringrekar

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी 'कन्नी' येत्या ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांनी पत्रकारांसोबत पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मजा, मस्ती, धमाल, कल्लोळाने वातावरण चैतन्यमय झाले होते. कलाकारांमध्ये कोण कोणाची पतंग कापणार, यात चुरसही लागली होती. यावेळी कलाकारांनी उपस्थितांना तिळगुळ देत, मकरसंक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.

नवीन झळकलेल्या पोस्टरमध्ये हृता हार घातलेल्या बिग बेनला मिठी मारताना दिसत असून बाकी कलाकारांच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी सांगू पाहात आहेत. आता नेमके काय प्रकरण आहे, हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार असले तरी या पोस्टरने मात्र सिनेरसिकांची उत्सुकता निश्चितच वाढवली आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, '' पोस्टर जरी तरुणाईला आकर्षित करणारे असले तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्ने ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. या सगळ्यांना जोडणाऱ्या 'कन्नी'ची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसाठी खास हे नवीन पोस्टर आणले आहे त्यासोबतच पतंग उडवून मकर संक्रांत साजरीही केली. खूप धमाल केली. अशीच धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाही येणार आहे.''

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव