मनोरंजन

रॉकीभाई आईला दिलेले वचन पूर्ण करेल काय? केजीएफ 3 बद्दल निर्मात्यांनी दिले संकेत

केजीएफ 2 च्या वर्षपुर्तीनिमित्त निर्मात्यांनी चाहत्यांना केजीएफ 3 च्या भागाबद्दल अपडेट दिले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

यश स्टारर चित्रपट केजीएफ 2 आज म्हणजेच 14 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण केले आहे. केजीएफनंतर त्याच्या दुसऱ्या पार्टनेही मोठ्या पडद्यावर खळबळ माजवली होती. यानंतर चाहत्यांना तिसऱ्या पार्टचे वेध लागले होते. अशातच, केजीएफ 2 च्या वर्षपुर्तीनिमित्त निर्मात्यांनी चाहत्यांना केजीएफ 3 च्या भागाबद्दल अपडेट दिले आहेत. प्रोडक्शन हाऊस होम्बल फिल्म्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. जर तुम्ही केजीएफ 2 काळजीपूर्वक पाहिला असेल, तर पडद्यावर 1978 ते 1981 पर्यंत स्क्रीन अचानक गायब झाल्याचे आठवेल. त्यानंतर रॉकी त्याच्या राज्याकडे, कोलार गोल्ड फील्ड्सकडे सरळ पाहताना दिसतो. या चार वर्षांत रॉकीने काय केले, हा प्रश्न आहे. केजीएफ 3 ची कथा या चार वर्षांच्या आसपास असल्याचे निर्मात्यांनी सूचित केले आहे.

इतकंच नाही तर या दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये या कथेत पुढे काय घडणार आहे ते आतापर्यंतची टक्कर आणि विध्वंसाचे हेही दाखवण्यात आले आहे. रॉकीची आणि रमिका सेन म्हणजेच रवीना टंडनची टक्कर होण्याचीही शक्यता आहे. तर, रॉकीभाई आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करेल काय, असेही व्हिडीओत विचारले आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, केजीएफ 3 चे शूटिंग 2025 मध्ये सुरू होईल. यशचा हा 19 वा चित्रपट असेल. 168 मिनिटांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना इतके मंत्रमुग्ध केले की जगभरातील चित्रपटाने 1250 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news