Admin
मनोरंजन

हंसिका मोटवानीच्या लग्नाचा बनणार शो, लवकरच तुम्हाला या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

दाक्षिणात्य ते बॉलीवूडपर्यंत चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू दाखवणाऱ्या हंसिका मोटवानीने नुकतेच तिच्या प्रियकराशी लग्न झाले.

Published by : Siddhi Naringrekar

दाक्षिणात्य ते बॉलीवूडपर्यंत चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू दाखवणाऱ्या हंसिका मोटवानीने नुकतेच तिच्या प्रियकराशी लग्न झाले. या शाही लग्नाची चांगलीच चर्चा झाली. हंसिका मोटवानीचे लग्न 4 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये झाले होते आणि सध्या ती अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे. लग्नाच्या एका महिन्यानंतर आता हंसिका तिच्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईझ देणार आहे, ज्याची तिने व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या आगामी शो 'हंसिका लव्ह शादी ड्रामा' ची घोषणा केली आहे. या शोमध्ये हंसिका मोटवानीचे खऱ्या आयुष्यातील लग्न दाखवण्यात येणार आहे. या शोमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत लग्नाचे विधी सादर केले जाणार आहेत. हा शो एक आउट-अँड-आउट रिअॅलिटी शो असेल, जो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल.

हंसिका मोटवानीने या व्हिडीओमध्ये शोबद्दल सांगताना सांगितले आहे. 'हाय, मी हंसिका मोटवानी आहे आणि नुकतेच माझ्या आयुष्यात खूप खास घडले, माझे लग्न झाले. संपूर्ण शादी फक्त डिस्ने+हॉटस्टारवर पाहता येईल. लव्ह शादी ड्रामा असे या शोचे नाव आहे. या शोमध्ये लग्नाच्या विधींसोबतच वेडिंग प्लानर्सपासून वेडिंग आउटफिट डिझायनर्सपर्यंत सर्व काही दाखवण्यात येणार आहे.

हंसिका मोटवानीच्या लग्नाचे सर्व फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, परंतु आता चाहत्यांना त्यांचे पूर्ण लग्न पाहण्याची संधी मिळणार आहे, ज्याबद्दल ते खूप उत्सुक आहेत. हंसिकाच्या या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, 'मी या शोसाठी खूप उत्सुक आहे'.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी