मनोरंजन

Gulshan kumar murder | अब्दुल रौफ मर्चंटची जन्मठेप कायम

Published by : Lokshahi News

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. कोर्टाने रौफला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती तसेच खून आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने अब्दुल रौफ जन्मठेपे शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची माफीस पात्र नाही, असे स्पष्ट केले.

१२ ऑगस्ट, १९९७ रोजी जुहूमधील जीत नगर येथील मंदिरातून बाहेर येताना टीव्ही मालिकेचे संगीतकार गुलशन कुमार यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. तीन हल्लेखोरांनी कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचा साथीदार, अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याला २००२ मध्ये कुमार यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात २६ आरोपींची नावे आहेत. कुमार यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसानंतर संगीतकार नदीम अख्तर सैफी हे या प्रकरणात सह-सूत्रधार असल्याचे समोर आले होते. टिप्स कॅसेटचे मालक रमेश तोरानी यांनी हत्येप्रकरणी अटक केली होती. हत्येनंतर सैफी हा ब्रिटनमध्ये स्थायिक झाला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी