मनोरंजन

प्रेक्षकांसाठी गुड न्यूज; सप्टेंबरमध्ये घरबसल्या पाहा हे चित्रपट आणि वेबसीरिज

बॉक्स ऑफिसप्रमाणेच येणारा सप्टेंबर महिना हा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी खास ठरणार आहे.

Published by : Team Lokshahi

ऑगस्ट महिना हिंदी चित्रपटसृष्टिसाठी अगदी खास ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त हिंदी चित्रपटांचा डंका वाजताना दिसला. ‘गदर २’, ‘ओह माय गॉड २’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘ड्रीम गर्ल २’सारखे लागून हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. इतकंच नव्हे तर या सगळ्या चित्रपटांनी मिळून महिन्याभरात १००० कोटींच्या घरात कमाईदेखील केली.

बॉक्स ऑफिसप्रमाणेच येणारा सप्टेंबर महिना हा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी खास ठरणार आहे हे स्पष्ट आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या अन् विषय हाताळणाऱ्या वेबसीरिज अन् चित्रपट या महिन्यात आपल्या भेटीला येणार आहेत. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊया.

हड्डी :

नवाजुद्दीन सिद्दीकी हा इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. आणि पुन्हा एकदा तो त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, त्याचा बहुप्रतिक्षित ‘हड्डी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

बंबई मेरी जान :

‘बंबई मेरी जान’ हा एक क्राईम ड्रामा आहे, जो १४ सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. या वेब सीरिजमध्ये एकूण १० भाग असतील. यामध्ये तुम्हाला केके मेनन, अविनाश तिवारी, कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य आणि अमायरा दस्तूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

स्कॅम २००३ :

‘स्कॅम १९९२’ च्या घवघवीत यशानंतर आता त्याचा दुसरा सीझन ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. सोनी लीव्हवर तुम्ही याचा पहिला भाग पाहू शकता.

द फ्रीलांसर :

डिस्ने प्लस हॉटस्टारवर नीरज पांडेची ‘द फ्रीलांसर’ ही वेब सिरीज आज १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाली आहे. भाव धुलिया दिग्दर्शित या मालिकेत अनुपम खेर, मोहित रैना आणि काश्मीर परदेसी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

काला :

चित्रपट निर्माते बेजॉय नांबियार यांचा नवीन क्राईम थ्रिलर ‘काला’ १५ सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये अविनाश तिवारी, रोहन विनोद मेहरा, हितेन तेजवानी, ताहेर शब्बीर आणि निवेथा पेथुराज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड