Kulswamini Team Lokshahi
मनोरंजन

११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात होणार देवीचा जागर! 'कुलस्वामिनी' चित्रपटाचं पोस्टर लाँच

अंबाबाईचाss..उदो उदो! मंडळी गेल्या १० दिवसांत आपण देवीमातेच्या नावाचा असंख्य वेळा जयघोष केला असेल.

Published by : shamal ghanekar

अंबाबाईचाss..उदो उदो! मंडळी गेल्या १० दिवसांत आपण देवीमातेच्या नावाचा असंख्य वेळा जयघोष केला असेल. भक्तांच्या नवसाला पावणारी, संकट काळात धावून येणारी आणि दुष्टांचा संहार करणारी अशी आपल्या देवीमातेची प्रतिमा आपल्या सगळ्यांच्याच मनात कायम वास करून असते. पण सृष्टीच्या कणाकणात वसलेलं देवीमातेचं रूप आपल्याला कधी, कुठे आणि कोणत्या रुपात येऊन भेटेल, याची खरतर कुणीच खात्री देऊ शकणार नाही. पण असं असलं, तरी देवीमातेची आपल्या भक्तांवर कायम कृपादृष्टी असते, याची मात्र खात्री आपल्याला ठायीठायी पटत असते. येत्या ११ नोव्हेंबरला हाच साक्षात्कार आपल्याला घडवण्यासाठी 'कुलस्वामिनी' हा चित्रपट आपल्या जवळच्या सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

अल्ट्रा मीडिया अ‍ॅ​​​​​ण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडनं आपल्या ख्यातीप्रमाणे हा अजून एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. कंपनीचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल चित्रपटाचे निर्माते आहे. लघुपट, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेले जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

देवीमातेच्या अगाध लीलेचं यथार्थ दर्शन 'कुलस्वामिनी' चित्रपटातून आपल्याला होणार याची खात्री या चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यावर नक्कीच होऊ शकेल. ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. अगदी १९९२ साली प्रदर्शित झालेल्या 'दौलत की जंग' पासून या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'ढ लेकाचा'मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री चित्रा देशमुख यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार हे पोस्टरवरून सहज लक्षात येतंय. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेल्या त्यांच्या फोटोच्या मागे साक्षात देवीमातेचा फोटो पोस्टरमध्ये दिसत आहे. अर्थात, चित्रा देशमुख साकारत असलेलं पात्र आणि त्यांच्यावर असणारी देवीमातेची कृपादृष्टी यांची वेगळ्याच पातळीवरची अनुभूती हा चित्रपट देणार हे नक्की!

Kulswamini

दसऱ्याच्या मुहूर्तावर देवीमातेच्या आशीर्वादानं या चित्रपटाचं ही भक्तीरसाने ओतप्रोत भरलेल्या या अद्भुत अनुभूतीसाठी तयार आहात ना? बोला अंबाबाईचाss..उदो उदो!

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती