Actor Vivek Oberoi Team Lokshahi
मनोरंजन

Happy Birthday Vivek Oberoi: मायाभाई ते पी एम मोदी... वाचा कसं आहे विवेकचं करीअर

पहिल्याच चित्रपटासाठी दोन फिल्मफेअर मात्र, भाईजान सलमान खानशी पंगा अन् विवेकच्या करीअरला लागला ब्रेक! मात्र विवेकनं केलं इतर भाषांच्या चित्रपटांतही काम...

Published by : Vikrant Shinde

विवेकानंद ओबेरॉय अर्थात विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi Birthday) याचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी झाला. विवेक जरी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी, तो काही तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही तो दिसला आहे. त्याने राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांच्या गँगस्टर ड्रामा 'कंपनी' या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये 2002 साली पदार्पण केले, ज्यासाठी त्याने 'सर्वोत्तम पदार्पण' व 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' असे दोन फिल्मफेअर पुरस्कार पटकावले.

त्यानंतर 2007 साली आलेल्या शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला (Shootout At Lokhadnwala) या गँगस्टर ड्रामा चित्रपटामध्ये त्या साकारलेली माया भाई ही मुख्य खलनायकाची भुमिका अतिशय लोकप्रिय ठरली. या भुमिकेसाठीही विवेकला दोन पुरस्कार मिळाले. याशिवाय विवेकने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांतून अनेक दर्जेदार भुमिका साकारल्या. मात्र उत्तम अभिनेता असुनही विवेक त्याच्या करीअरच्या उच्चतम शिखरावर पोहोचू शकला नाही.

विवेकने काम केलेले काही लोकप्रिय चित्रपट:

  1. कंपनी (2002)

  2. साथिया (2002)

  3. दम (2003)

  4. डरना मना है (2003)

  5. युवा (2004)

  6. मस्ती (2004)

  7. दीवाने हुये पागल (2005)

  8. ओमकारा (2006)

  9. नक्शा (2006)

  10. शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला (2007)

  11. रक्त चरित्र- भाग 1 (2010)

  12. रक्त चरित्र- भाग 2 (2010)

  13. ग्रँड मस्ती (2013)

  14. ग्रेट ग्रँड मस्ती (2016)

  15. पी एम नरेंद्र मोदी (P M Narendra Modi) (2019)

का लागला विवेकच्या करीअरला ब्रेक?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचं ऐश्वर्या राय (Salman Khan & Aishwarya Rai Relationship) सोबत असलेलं नातं तुटल्यानंतर विवेकनं ऐश्वर्या सोबत नातं जोडलं (Vivek Oberoi Relationship with Aishwarya Rai) जे सलमानला आवडलं नाही. इतक्यावरच तो थांबला नाही तर, त्यानं आणखी एक मोठी चूक केली. एक पत्रकार परिषद बोलवत 'त्याला सलमानकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं' त्यानं म्हटलं. तर, सलमानने त्याला तब्बल 42 वेळा फोन केल्याचा दावा देखील त्यानं केला. यानंतर जणू विवेकचे आयुष्यच बदलून गेले. जिच्यासाठी विवेकने एवढं मोठं पाऊल उचललं, तिनेही त्याची साथ सोडून दिली. मात्र, या सगळ्याचा विवेकच्या करिअरवर प्रचंड परिणाम झाला.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा