मनोरंजन

शाहरुख खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत 'स्वदेश' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री गायत्री जोशीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गायत्री जोशी यांची कारचा भीषण अपघात झाला आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत 'स्वदेश' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री गायत्री जोशीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गायत्री जोशी यांची कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा गायत्री जोशी आणि त्यांचे पती विकास ओबेरॉय हेही कारमध्ये होते. या अपघातात गायत्री जोशी आणि त्यांचे पती सुखरूप आहेत मात्र दुसऱ्या कारमधून प्रवास करणाऱ्या स्विस जोडप्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायत्री जोशी पती विकास ओबेरॉयसोबत इटलीमध्ये राहते. ही घटना इटलीमध्ये घडली आहे.

हा कार अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडला आणि त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मागून येणाऱ्या कारमधून शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मिनी ट्रक पुढे जात असून अनेक आलिशान वाहने वेगाने धावताना दिसत आहेत. दरम्यान, गायत्री जोशी या पतीसोबत लॅम्बोर्गिनीमध्ये जात होत्या. यानंतर गायत्री जोशी यांच्या लॅम्बोर्गिनीला धडकून मिनी ट्रकला धडकली. त्यानंतर मिनी ट्रक उलटला आणि फेरारीला आग लागली. या फेरारीमध्ये प्रवास करणाऱ्या स्विस जोडप्याचा मृत्यू झाला. गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय ठीक असल्याचे सांगितले जात आहे आणि एका न्यूज वेबसाइटशी बोलताना तिने सांगितले की, ती आणि तिचा पती पूर्णपणे बरा आहे.

गायत्री जोशीने 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'स्वदेश' चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात गायत्री जोशी मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती. मात्र, गायत्री जोशी यांनी अभिनय सोडल्यामुळे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली नाही. गायत्री जोशीने बिझनेसमन विकास ओबेरॉयशी लग्न केले असून ती सध्या इटलीमध्ये आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण