वसई - विरार : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला बोलावलं जात आहे. गौतमीही आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाला हजेरी लावत असते. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे. त्यामध्ये आता गौतमीच्या आडनावाचा वाद देखील समोर आला आहे.
या वादावर गौतमीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या आडनावावर आक्षेप घेणाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गौतमी म्हणाली की, मी आता या गोष्टींकडे लक्ष देणार नाही. मला कोणीही काहीही बोलतं. पण माला फरक पडत नाही. मी कुणाचीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक असतो. तो चांगला पार पडतो. जर कोणाला काही प्रश्न असतील त्याने कार्यक्रमाला यावं पाहावं कार्यक्रम कसा पार पडतो ते. तसेच माझं आडनाव पाटीलच आहे. त्यामुळे मी पाटील हेच आडनाव लावणार असं उत्तर गौतमीने दिलं आहे.
गौतमीच्या आडनावावर मराठा संघटनेचा आक्षेप :
मराठा क्रांती ठोक मोर्चाने गौतमीच्या पाटील या आडनावावर आक्षेप घेतला होता. त्यांनी असा आरोप केला आहे की, गौतमीचं खर आडनाव हे पाटील नसून चाबुकस्वार आहे. मात्र तिने पाटील आडनाव लावल्याने आणि ती एक नृत्यांगणा असल्याने पाटील आडनावाची बदनामी होत आहे. असं या संघटननेच म्हणणं आहे. तसेच या मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक राजेंद्र जऱ्हाड-पाटील यांनी गौतमीचा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. त्यानंर आता गौतमीने माध्यामांसमोर आपली बाजू मांडली.
गौतमी पाटील आपल्या अश्लील डान्सच्या हावभाव करत असल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण तरीही तिने आपल्या अदाकारीने सर्वांना मोठ्या प्रमाणात वेड लावले आहे. गौतमीची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असली, तरीही तिने यासर्व गौष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या डान्सवर जास्त फोकस केला आहे. गौतमीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.