सनी देओलचा बहुचर्चित चित्रपट गदर 2 शुक्रवारी 11ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत गदर 2 प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. ब्लॉकबस्टर 'गदर' नंतर या चित्रपटाचा सिक्वेल 'गदर 2' आता दुसऱ्या पिढीच्या कसोटीवरही उतरताना दिसत आहे. 22 वर्षांपूर्वी 'गदर' चित्रपटाची जी क्रेझ प्रेक्षकांमध्ये होती, तीच क्रेझ आज 'गदर २'बाबत प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. परिणामी 'गदर: एक प्रेम कथा'ने जगभरात जितकी कमाई केली होती तितकी या चित्रपटाने तीन दिवसांत कमाई केली आहे.
गदर 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3: सनी देओलचा 'गदर 2 - द कथा कंटिन्यूय' लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सनी देओल आणि अमीषा पटेल स्टारर चित्रपटाने खरोखरच खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही काळापासून बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यात मागे पडत असताना, अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, 'गदर 2' ने रविवारी तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. सर्व चित्रपटगृहात हाऊसफुलच्या पाट्या दिसून आल्या. पहिल्या दिवशी 40.1 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी 43.08 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली असून 50 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच अवघ्या 3 दिवसांत या चित्रपटाने 133.18 कोटींची कमाई केली आहे.
गदर 2 ने जगभरातदेखील इतकी कमाई केली आहे की, हा सनी देओलच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. आता गदर 2 चे तीन दिवसातील कलेक्शन पाहता आता या चित्रपटाची तुलना बाहुबलीने 3 दिवसात केलेल्या कमाईबरोबर केला जात आहे. 'बाहुबली 2' ने तीन दिवसांत हिंदीत केवळ 74.4 कोटींची कमाई केली, तर 'बाहुबली: द बिगिनिंग'ने तीन दिवसांत हिंदीत केवळ 22.35 कोटींची कमाई केली. आता येणाऱ्या काळात गदर 2 आणखी किती कमाई करणे हे पाहणे महत्वाचे आणि औत्सुक्याचे ठरणार आहे.