मनोरंजन

‘या’ कारणाने रीया चक्रवर्ती येणार नाही ‘BIG BOSS’ च्या घरात

Published by : Lokshahi News

हिंदीमधील छोट्या पडद्यावरील बिग बॉस सीझन 14 संपल्यापासून आता 'बिग बॉस 15' ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी चर्चेत असलेली रिया चक्रवर्ती गेल्या वर्षभरापासून सुशांत सिंह चर्चेत आहे. रिया चक्रवर्ती बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

वृत्तानुसार, निर्मात्यांनी रियाला शोसाठी ऑफर केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला निर्मात्यांनी दर आठवड्याला ३५ लाख रुपये देऊ केले आहेत. जर हे वृत्त खरे असेल तर रिया चक्रवर्ती बिग बॉसची आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक ठरेल. रिया ही 'बिग बॉस' शो चे प्रमुख आकर्षण ठरू शकेल, असा अंदाज असल्यामुळे निर्मात्यांनी तिच्यासाठी मोठी किंमत मोजायचीही तयारी दाखवली आहे.

परंतू, रिऍलिटी शो मधून पैसा आणि प्रसिद्धी एकाचवेळी मिळवण्यापेक्षा फिल्मी करिअरला पुन्हा एकदा चालना देण्याचा प्रयत्न ती करणार आहे, असे समजते आहे. याच संदर्भात ती बॉलिवूड आणि दक्षिणेकडील निर्मात्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. तिला चांगले सिनेमे मिळण्याची अपेक्षाही आहे. याशिवाय 'बिग बॉस'मध्ये न जाण्यासाठी तिच्याकडे आणखीन एक कारण आहे. सुशांत सिंह प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेत ती अडकलेली आहे. त्यासाठी तिला मध्येच कोर्ट कचेऱ्या कराव्या लागणार आहेत.

२ ऑक्टोबरपासून ' बिग बॉस १५' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्री शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, डोनल बिष्ट, करण कुंद्रा, निधी भानुशाली शमिता शेट्टी, निशांत भट्ट हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

New Zealand Member Of Parliament: कोण आहे न्यूझीलंडची ती तरुण आक्रमक खासदार? जाणून घ्या...

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...