मनोरंजन

बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ श्रीदेवी आणि 30 रंजक गोष्टी!

Published by : Lokshahi News

एके काळी श्रीदेवी बॉलिवूडवर राज्य करायची. आज ती या जगात नाही, मात्र तिच्या आठवणी लोकांच्या मनात आजही ताज्या आहे. या महानायिकेचा आज जन्मदिवस. यानिमित्त त्यांच्याविषयी माहित नसलेल्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात…

  • श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी शिवकाशी, तामिळनाडू येथे झाला. जन्माच्या वेळी तिचे नाव श्रीअम्मा यंगेर अय्यपन होते. तिची मातृभाषा तामिळ आहे.
  • श्रीदेवीचे वडील वकील होते आणि आई गृहिणी. तिला एक बहीण आणि 2 सावत्र भाऊही होते.
  • थिरुमुघम यांच्या 'थुनाईवन' चित्रपटापासून तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली त्यावेळीस तिचे वय होते अवघे 4 वर्ष. तर बॉलिवूडमध्ये 'ज्युली' हिट चित्रपटामधून बाल कलाकार म्हणून तिने पदार्पण केले.
  • 1979मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून 'सोलवां सावन' या चित्रपटात ती दिसली होती पण 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' या चित्रपटापासून तिला ओळख मिळाली.
  • श्रीदेवीने तिच्या कारकीर्दीत हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांत काम केले. तमिळ चित्रपट 'मोन्दरु मूडीचु' मधे रजनीकांतची सावत्र आई म्हणून काम करतेवेळी श्रीदेवी 13 वर्षाची होती.
  • श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये काम सुरु केले त्यावेळी तिला हिंदीमध्ये बोलणे आवडत नव्हते. म्हणून तिचा आवाज बहुतेकदा डब करण्यात आला होता. अखेर श्रीदेवीने तिच्या 'चांदनी' चित्रपटात तिच्या डायलॉगसाठी प्रथम डब केले.
  • असे म्हटले जाते कि, मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी गुप्तपणे लग्न केले होते. पण काही काळानंतर ते दोघे वेगळे झाले. माध्यमांना त्यांच्या लग्नाचे प्रमाणपत्र देखील हाती लागले होते.
  • 1996 मध्ये श्रीदेवीने अनिल कपूर आणि संजय कपूर यांचा मोठा भाऊ चित्रपट निर्माता बोनी कपूरशी लग्न केले. ती अर्जुन कपूरची सावत्र आई होती.
  • असे म्हणतात की, श्रीदेवी लग्नापूर्वी गर्भवती होती.
  • श्रीदेवीला जान्हवी आणि खुशी नावाच्या 2 मुली आहेत. हेच नाव तिच्या पती बोनी कपूरच्या जुदाई (1997) आणि हमारा दिल आपके पास है (2000) चित्रपटाच्या नायिकांचे देखील होते.
  • श्रीदेवीची मुलगी जान्हवीची आवडती अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता हृतिक रोशन आहे तर प्रीती झिंटाची आवडती अभिनेत्री श्रीदेवी आहे.
  • श्रीदेवीचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर 'Pineapple' होते.
  • श्रीदेवीचा आवडता रंग पांढरा होता. म्हणून ती फंक्शनमध्ये पांढरे कपडे घालणे पसंत करायची.
  • श्रीदेवीने तेलुगू सुपरस्टार एनटी रामा राव यांच्याबरोबर एका लहान मुलीचे काम केले आणि काही वर्षांनी ती त्यांची नायिका बनली. नंतर तिने एनटी यांचा मुलगा बलराज राव यांच्यासोबत एका चित्रपटात देखील काम केले.
  • श्रीदेवीवर चित्रीत झालेल्या 'रूप की रानी चोरों चित्रपटातील 'दुश्मन दिल का वो है' गाण्यासाठी तिने 25 किलोपेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा ड्रेस परिधान केला होता. ज्याची शूटिंग 15 दिवस सुरु होती.
  • श्रीदेवीला चित्रकलेची खूप आवड होती. मार्च 2010 मध्ये त्यांची पेंटिंग्ज आंतरराष्ट्रीय आर्ट लिलावातून विकली गेली. यातून मिळालेली रक्कम तिने दान केली. श्रीदेवीच्या या कलेच्या चाहत्यांमध्ये सलमान खान आणि मनीष मल्होत्रा ​​यांचा समावेश आहे. त्यांच्या घरात श्रीदेवीने बनविलेले पेंटिंग्ज आहेत.
  • श्रीदेवीला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट नर्तक मानली जाते. असे म्हटले जाते की, तिच्या गाण्या आणि नृत्याच्या लोकप्रियतेमुळेच लोकांना तिच्या चित्रपटांबद्दल माहित व्हायचे. श्रीदेवीला डान्सर्समध्ये शम्मी कपूर आणि मायकेल जॅक्सन आवडायचे.
  • श्रीदेवी बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री होती. 90 च्या दशकात सुमारे एक कोटी रुपये घेणारी ती एकमेव अभिनेत्री होती.
  • श्रीदेवी जेव्हा यशाच्या शिखरावर होती तेव्हा तिला तिच्या टीमबरोबर काम करण्यास आवडत असे, ज्यात नृत्य दिग्दर्शक सरोज खान, डिझाइनर नीता लुल्ला आणि मनीष मल्होत्रा, फोटोग्राफर राकेश श्रेष्ठ आणि गौतम हेड ऑफ स्टेट आणि मेकअप मॅन मिकी ठेकेदार होते.
  • श्रीदेवीच्या 3 हिट चित्रपट असे होते की, ज्यात तिला दुसरी पसंती म्हणून निवडले गेले होते. 'नगीना' जयप्रदा यांनी, 'चांदनी' रेखा आणि सदमा' डिंपल कपाडिया यांनी नाकारला होता.
  • श्रीदेवीने जवळ-जवळ 3 दशकांच्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत काम केले. 1970 च्या दशकात राजेश खन्ना, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, ऋषी कपूर, 80 च्या दशकात सनी देओल, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि 90 च्या दशकात शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खानची नायिका श्रीदेवी झाली.
  • श्रीदेवीची आवडती अमेरिकन अभिनेत्री होती मेरली स्ट्रिप आणि ज्युलिया रॉबर्ट्स. जेव्हा एमटीव्ही प्रथम मुंबईत सुरू झाला तेव्हा व्हीजेने श्रीदेवीला 'रूप की रानी चोरों का राजा' च्या सेटवर 'बॉलिवूडची ज्युलिया रॉबर्ट्स' अशी उपाधी दिली होती.
  • श्रीदेवीचा मेकअपवर विश्वास नव्हता. तिच्याकडे मॅकअप किटच्या नावाने La Prairie प्रेरी प्लॅटिनम क्रीम, काही आयलायनर आणि लिप ग्लॉस होता.
  • श्रीदेवीने तिच्या आवडत्या सह-अभिनेत्याचे नाव कधीच नमूद केलेले नाही. पण कबूल केले की, अमिताभ बच्चन सर्वात महान आहेत.
  • अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला 'चालबाज' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला. जवळपास एक दशकानंतर, श्रीदेवीने अमिताभ यांना 'ब्लॅक' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला. श्रीदेवीला मांजरींची खूप भीती वाटायची. तरी देखील 'सिने ब्लिट्ज'च्या मुखपृष्ठासाठी तिने मांजरीबरोबर पोज दिले होते.
  • श्रीदेवीसाठी बहुतेक गाणी आशा भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायली आहेत. लता मंगेशकर यांनी श्रीदेवीची सर्व लोकप्रिय गाणी गायली. खुद्द श्रीदेवींनी जॉली मुखर्जी यांच्यासमवेत 'चांदनी' चित्रपटाचा सुपरहिट टायटल ट्रॅक गायला होता.
  • श्रीदेवीवर चित्रित झालेलं 'जांबाज' चित्रपटातील गीत 'हर किसी को नहीं मिलता' सुपरहिट झाले होते. या गाण्याने शिफॉन साडीला लोकप्रिय केले.
  • 'हीर-रांझा' चित्रपटासाठी श्रीदेवीने स्वत: चे ड्रेस डिझाइन केले होते. जे बिगॉन एराच्या चित्रांनी प्रेरित झालेले होते.
  • 15 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर 2012 मध्ये श्रीदेवीने 'इंग्लिश-विंग्लिश' चित्रपटाद्वारे पुनरागमन केले.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा