आमिर खान(Aamir Khan) त्याची सर्व कामे खूप परफेक्शनने करतो. म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. त्याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन काही दिवस लोटले आहेत. परंतु अद्याप हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणताही चमत्कार दाखवू शकलेला नाही. एक काळ असा होता की प्रेक्षक आमिरच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. पण लाल सिंग चड्ढा या चित्रपटाची अवस्था पाहता आमिर खानच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. लालसिंग चड्ढा या चित्रपटाची परिस्थिती अशी झाली आहे की चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षक आणि ओटीटीवर खरेदीदार देखील मिळत नाहीत. मात्र आता निर्मात्यांच्या अडचणी कमी होताना दिसत आहेत. अखेर लाल सिंग चड्ढा चित्रपटाला ओटीटी खरेदीदार मिळाला आहे.
हा चित्रपट नेटफ्लिक्सने कमी डीलमध्ये विकत घेतल्याचं बोललं जातय. मीडिया रिपोर्ट्सनुसार नेटफ्लिक्स हा चित्रपट खरेदी करण्यास प्रचंड उत्सुक होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार निर्मात्यांनी OTT समोर 150 कोटी रुपयांची डील ठेवली होती. परंतु Netflix ला ही रक्कम खूप जास्त वाटली. त्यामुळे नंतर ती 80 ते 90 कोटींमध्ये कन्फर्म झाली. पण जेव्हा लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला तेव्हा डील अवघ्या 50 कोटींवर आली. पण नंतर बातमी आली की नेटफ्लिक्सने हा करार रद्द केला आहे. यानंतर आमिर खानने आपल्या चित्रपटासाठी वेगळ्या व्यासपीठाच्या शोधात सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार,₹ आमिर खान आणि नेटफ्लिक्समध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली असून आता हा चित्रपट फक्त नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. पण नवीन नियमानुसार हा चित्रपट रिलीजच्या तारखेनंतर केवळ आठ आठवड्यांनी ओटीटीवर येईल.