मनोरंजन

समांथा आणि नागाचैतन्यच्या घटस्फोटावर वडील नागार्जुन यांची प्रतिक्रिया…

Published by : Lokshahi News

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागाचैतन्य ओळखले जात होते. नागा चैतन्य आणि सामंथा अक्किनेनी यांच्यात घटस्फोट झाला आहे. स्वतः सामंथाने या प्रकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, सामंथाने तिच्या घटस्फोटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

नागार्जुन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी जड अंतःकरणाने ही पोस्ट लिहीत आहे, सॅम आणि चय यांच्यामध्ये जे झाले ते खूपच वाईट आहे. पती पत्नीमध्ये जे होते ते खूपच वैयक्तिक असते. सॅम आणि चय माझ्यासाठी खूपच जवळचे आहेत. माझे कुटुंब नेहमीच सामंथासोबत घालवलेल्या सर्वच क्षण खूप एन्जॉय करतील. सामंथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असेल. दोघांनाही देव शांती देवो आणि कणखर करो."

समांथा आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात फूट पडण्याचे कारण समांथाचे चित्रपट आणि करिअरवर असलेले तिचे प्रेम आहे. लग्नानंतरही समांथा चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि ग्लॅमरस फोटोशूट करत राहते. पण पती नागा चैतन्य आणि तिचे सासरे नागार्जुन यांना हे आवडत नाही. दोघेही समांथाला तिचे मन बदलण्यासाठी आणि सासू अमला अक्किनेनीच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, 'फॅमिली मॅन २' या वेब सीरिजमध्ये समांथाने बोल्ड भूमिका साकारली होती. त्याचा परिणाम हा नागा चैतन्य आणि तिच्या वैवाहिक जीवनावर झाला आहे. त्यामुळे ते विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

२००९ मध्ये 'ये माया चेसावे' या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली होती. त्यावेळी नागा चैतन्य कमल हसन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व 'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. २०१५ मध्ये 'ऑटोनगर सूर्या' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघे पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...