सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. एन. डी स्टुडिओमध्ये संपवल जीवन. हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. स्टुडिओ सुरक्षा रक्षकाने पोलिसांनी माहिती दिली की, नितिन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशीरा किंवा सकाळी जायचे ते आज बाहेर आले नाही म्हणुन सुरक्षा रक्षक पहायला गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. सकाळी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करुन माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाल्याचे समजते. नितीन देसाई यांनी एका कंपनीकडून तब्बल 180 कोटींच कर्ज घेतलं होतं. एडलवाईज कंपनीला या कर्जाची पूर्तता करणे आवश्यक होतं मात्र देसाई ते करू शकले नाहीत. नितीन देसाई यांनी मालमत्ता जप्त करून आम्हाला भरपाई करून द्या असा एडलवाईज कंपनीचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव होता.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एडलवाईज कंपनीने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता. सरफेसी कायद्यांतर्गत होणारी ही कारवाई प्रलंबित होती. 180 कोटी कर्जासाठी नितीन देसाई यांनी आपल्या काही जमिनी गहाण ठेवल्या होत्या. अशी माहिती मिळत आहे.